ब्रिस्बेन : तिसरा कसोटी सामना भारताने पराभवापासून वाचवला, असे म्हटले जात आहे. पण ऑस्ट्रेलिया कधीही काहीही करू शकते. त्यामुळे या ब्रिस्बेन कसोटीच्या पाचव्या दिवशी भारताचा पराभवा होऊ शकतो, याची शक्यता आता समोर आली आहे.
बुमराह आणि आकाश दीपवर मदार..
जसप्रीत बुमराह आणि आकाश दीप यांच्यावर भारताची मदार असल्याचे आता म्हटले जात आहे. भारताची ह अखेरची जोडी आहे. या जोडीने फॉलो ऑन टाळला आहे. त्यामुळे फॉलो ऑनचे संकट दूर झाले असले तरी या दोघांवर भारताची मदार असेल. कारण या दोघांनी पाचव्या दिवशी जास्त षटके फलंदाजी केली, तर संघाचा विजय दुरावू शकतो. पण या दोघांपैकी एक जरी लवकर बाद झाला तरी भारताचा डाव आटोपणार आहे आणि ऑस्ट्रेलियाला वरचढ होण्याची संधी मिळेल.ऑस्ट्रेलिया यावेळी नेमकं काय करू शकते....
ऑस्ट्रेलियाने भारताची अखेरची विकेट लवकर काढली, तर त्यानंतर ते आक्रमक रुप धारण करून फलंदाजीला उतरतील. ऑस्ट्रेलियाचा संघ यावेळी २०-२५ षटके खेळण्याचा प्रयत्न करेल. या २० -२५ षटकांत ऑस्ट्रेलियाचा संघ १००-१५० धावा जमवण्याचा प्रयत्न करेल. ३५० धावांचे आव्हान हे पाचव्या दिवशी चांगले ठरू शकते. त्यामुळे ऑस्ट्रेलिया टी २० स्वरुपाची फलंदाजी करेल आणि भारताला ३५० धावांचे आव्हान विजयासाठी देऊ शकतो.भारतीय संघाचा पराभव कसा होऊ शकतो...
भारताची फलंदाजी तिसऱ्या कसोटीत ढासळलेली आहे. त्यामुळे जर विजयासाठी ३५० धावांचे आव्हान असेल तर ते बचाव करायला जातील. भारतीय फलंदाज बचाव करायला गेले तर ते लवकर बाद होतात, हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे भारतीय संघाचा अशा प्रकारे पराभव होऊ शकतो, अशी शक्यता आता समोर येत आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ काय रणनिती वापरते, यावर सामन्याला निकाल अवलंबून असू शकतो.भारताला या सामन्यात विजयाची संधी फारच कमी आहे. पण त्यांच्या पराभवाची शक्यता जास्त आहे. त्यामुळे आता सामन्याच्या पाचव्या दिवशी नेमकं काय घडतं, याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली असेल.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/WdGVX0N
No comments:
Post a Comment