Breaking

Monday, December 16, 2024

जसप्रीत बुमराहने पत्रकाराची बोलती एका वाक्यात केली बंद, खोचक प्रश्नावर दिले भन्नाट उत्तर... https://ift.tt/a7j1YiJ

: जसप्रीत बुमराह गोलंदाजीमधूनच बरंच काही बोलून जातो. पण जर कोणी त्याला विचित्र प्रश्न विचारला तर त्याला क्लीन बोल्ड केल्यााशिवाय बुमराह गप्प पण बसत नाही, हे आता समोर आले आहे. ब्रिस्बेन कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यावर पत्रकाराने बुमराहला भारताच्या फलंदाजीबाबत प्रश्न विचारला. जो खरं तर चुकीचा होता. पण या प्रश्नावर जसप्रीत बुमराहने भन्नाट उत्तर देत पत्रकाराचे तोंडच बंद केले.

पत्रकाराने जसप्रीत बुमराहला कोणता प्रश्न विचारला...

पत्रकाराने बुमराहला विचारले की, " भारताच्या फलंदाजीबाबत तुझे काय आकलन आहे. तु या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी उपयुक्त व्यक्ती नाहीस, हे मला माहिती आहे. पण ब्रिस्बेनच्या कसोटीची परिस्थिती पाहता तुझ्या संघाच्या फलंदाजीबाबत तु काय विचार करतो आहे... " जसप्रीत बुमराहला हा विचित्र प्रश्न पत्रकाराने विचारला. कारण बुमराह हा गोलंदाज आहे. एकिकडे तु या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तु उपयुक्त व्यक्ती नाही, असेही पत्रकाराने म्हटले आणि त्याला हा प्रश्नही विचारला.

बुमराहने काय दिले या प्रश्नाचे उत्तर...

बुमराह यावेळी उत्तर देताना म्हणाला की, " हा एक रंजकदार प्रश्न आहे. तुम्ही माझ्या फलंदाजीच्या क्षमतेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात. तुम्हाला Google चा वापर करायला हवा आणि ही गोष्ट पाहायला हवी की कसोटी क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा कोणाच्या नावावर आहेत. " जसप्रीत बुमराहने यावेळी एका वाक्यात पत्रकाराचे तोंड बंद केले. कारण एका षटकात जसप्रीत बुमराहने ३५ धावा फटकावल्या होत्या. हा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात झाला होता. त्यावेळी जसप्रीत बुमराहसमोर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड होता. स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात पाच चौकार आणि तीन षटकार लगावले होते. या षटकात दोन नो बॉलही होते. त्यामुळे जसप्रीत बुमराहने यावेळी पत्रकाराचे तोंड एका गोष्टीच्या जोरावर बंद केले. ब्रिस्बेन कसोटीचे आता दोन दिवस बाकी आहेत. या दोन दिवसांत भारतीय संघ कशी कामगिरी करतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले असेल.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Bs1vzQw

No comments:

Post a Comment