नवी दिल्ली: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका महिलेला झाडाला बांधून मारहाण करण्यात येत असल्याचं दिसत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये काही लोकांची गर्दीही दिसत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना सोशल मीडियावर हा व्हिडिओ शरिया कायदाशी जोडण्यात आला आहे.
दावा काय आहे?
सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करताना @realMaalouf नावाच्या युजरने लिहिले - ते सर्व जण याकडे असे पाहत आहेत जसे की ही एक सामान्य गोष्ट आहे? शरिया कायदा पूर्णपणे वाईट आहे!तपासात काय आढळून आलं
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओचा जेव्हा सजगच्या टीमने फॅक्ट चेक केला तेव्हा गुगलवर इतरही अनेक पोस्ट आढळल्या. जे दोन-तीन वर्ष जुने होते.या घटना आताच्या नाहीत हे स्पष्ट झालं आहे. यानंतर, आम्ही व्हिडिओच्या कीफ्रेम काढल्या आणि गुगलवर शोधलं, तेव्हा चा एक अहवाल सापडला.या अहवालानुसार, ही घटना २०१८ मध्ये उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे घडली होती. त्यानंतरच सजगच्या टीमने काही भारतीय वेबसाइट शोधण्यास सुरुवात केली तेव्हा चा अहवाल सापडला.बुलंदशहरमधील एका महिलेला तिच्या पतीने गावच्या पंचायतीच्या आदेशावरून सार्वजनिकपणे मारहाण केली होती. तिच्यावर दुसऱ्या पुरुषासोबत पळून गेल्याचा आरोप होता.बुलंदशहरचे एसपी प्रवीण रंजन सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'पोलिसांनी याप्रकरणी महिलेचा पती, माजी पंचायत प्रमुख आणि त्याच्या मुलाला अटक केली आहे.' १० मार्च २०१८ ला ही घटना घडली होती आणि दहा दिवसांनी व्हिडिओ व्हायरल झाला होता. हिरवा शर्ट घातलेला माणूस महिलेला मारहाण करणारा तिचा पती सौदान सिंग होता. वृत्तानुसार, पोलिसांनी माजी गावप्रमुख शेर सिंह आणि त्याचा मुलगा श्रावण यांच्यासह सौदान सिंगला अटक केली होती. यावरून आरोपी मुस्लिम नसल्याचे स्पष्ट होते.निष्कर्ष:
शरिया कायद्याचा हवाला देत महिलेला झाडाला बांधून मारहाण केल्याचा सोशल मीडियावरील दावा पूर्णपणे खोटा ठरला आहे. सजगच्या तपासात हा व्हायरल दावा खोटा असल्याचे निष्पन्न झाले आहे. महिलेवर अत्याचार करणारी व्यक्ती हिंदू होती आणि हा व्हिडिओ २०१८ चा आहे.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/qKYACQI
No comments:
Post a Comment