Breaking

Wednesday, December 18, 2024

बाबो! कोळसा खाणींची मालकीण ते मालदिवमध्ये प्रायव्हेट व्हिला… अंकिता लोखंडेकडे आहे गडगंज संपत्ती! https://ift.tt/F5PqR8y

मुंबई- टीव्ही अभिनेत्री सतत लोकांच्या चर्चेचा विषय असते. काही काळापूर्वी ती बिग बॉस १७ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. त्यात ती विजेती बनली नसली तरी ती त्या सीझनची एक प्रसिद्ध स्पर्धक नक्कीच बनली आहे. त्यानंतर अंकिता कलर्सवरील लाफ्टर शेफमध्ये सुद्धा दिसलेली. विग बॉस मध्ये अंकिता लोखंडे सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक होती. तिने एका आठवड्यासाठी बिग बॉसच्या निर्मात्यांकडून १२ लाख रुपये घेतल्याचे म्हटले जाते. आज अंकिता तिचा ४० वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडे लक्झरी लाइफ जगते. तिची जीवनशैली कोणत्याही मोठ्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. अभिनयासोबतच अंकिता सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती इन्स्टाग्रामवर रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींचे अपडेट्स शेअर करत असते.टीव्ही सीरियलमधून अभिनय करिअरची सुरुवात: अंकिता लोखंडेने तिच्या अभिनय करिअरची सुरुवात टीव्ही सीरियल 'पवित्र रिश्ता'मधून केली होती. या मालिकेत तिने ७ वर्षे काम केले. याशिवाय ती काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही दिसली. अंकिता ही एक यशस्वी अभिनेत्री आहे.अंकिता लोखंडेने डिसेंबर २०२१ मध्ये बिझनेसमन विकी जैनसोबत लग्न केले. मिळालेल्या माहितीनुसार, अंकिता पती विकी जैनसोबत मुंबईत एका आलिशान ८ BHK घरात राहते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विकीने मालदीवमधील एक खाजगी व्हिला देखील अंकिताला लग्नासाठी गिफ्ट म्हणून दिला आहे, ज्याची किंमत ५० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.अंकिता २५ कोटी रुपयांच्या मालमत्तेची मालक आहे, अंकिता लोखंडे देखील भेटवस्तू देण्याच्या बाबतीत तिचा पती विकीपेक्षा कमी नाही. तिने विकीला ८ कोटी रुपये किमतीची खाजगी यॉच भेट दिल्याचे बोलले जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एकट्या अंकिता लोखंडेची एकूण संपत्ती २५ कोटी रुपये आहे. याशिवाय तिचा पती विकी जैन हे 'महावीर इन्स्पायर ग्रुप' या मल्टीनॅशनल कंपनीचा मालक आहे. विकी जैनच्या कोशळाच्या खाणी देखील आहेत. ज्याचा बिग बॉस आणि लाफ्टर शेफमध्ये बरेचदा उल्लेख झाला होता. अंकिता लोखंडेच्या महागड्या गाड्या : अंकिता लोखंडे आलिशान कारची शौकीन आहे. तिच्याकडे पोर्श 718 बॉक्सस्टर कार आहे ज्याची किंमत १.४९ कोटी रुपये आहे. याशिवाय तिच्या कार कलेक्शनमध्ये Jaguar XF सारखी आलिशान कार देखील आहे. या कारची किंमत ७६ लाख रुपये आहे. अंकिताकडे मर्सिडीज बेंझ व्ही क्लास कार देखील आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/lKtrSag

No comments:

Post a Comment