जयपूर: प्रेमविवाह केलेली एक तरुणी संशयास्पद परिस्थितीत मृतावस्थेत आढळून आली आहे. जयपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती आहे. हुंड्यासाठी सासरच्यांची विवाहितेची हत्या केल्याचा आरोप तिच्या घरच्यांनी केला आहे. विवाहितेची हत्या करुन घरात तिचा मृतदेह फासावर लटकवल्याचा आरोप करण्यात आला आहे. मृत तरुणीच्या वडिलांनी दावा केला की घटनेच्या काही वेळापूर्वी मुलीने आपल्या चुलत भावाला फोन करून तिची हत्या होणार असल्याची भीती व्यक्त केली होती आणि तिच्या शरीरावर जखमांच्या खुणाही होत्या.१५ डिसेंबरला रात्री ८ वाजता सीबीआय कॉलनीतील घरी हर्षिताचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. यानंतर पती पंकजने तिला जयपूरिया रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तिथे हर्षिताला मृत घोषित केले.यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी हर्षिताच्या काकांना फोन करुन घटनेची माहिती दिली. त्यानंतर हर्षिताने आपल्या काकाचा मुलगा लोकेश याला फोन केल्याचे समोर आले. ती नेहमीत लोकेशला फोन करून तिच्या वेदना सांगायची. १५ डिसेंबरला दुपारच्या सुमारास तिने लोकेशला फोन केला आणि म्हणाली - 'दादा, पंकज आणि सासरे मला मारुन टाकतील, त्यांना पैसे द्या. तुम्ही पप्पाला सांगा, मला तुमच्याकडे यायचे आहे.'याप्रकरणी, एसीपी सांगानेर विनोद कुमार शर्मा यांनी सांगितले की, या घटनेनंतर वडील अशोक तंवर यांच्या वतीने रामनगरिया पोलीस ठाण्यात पंकज आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध हुंड्यासाठी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीचा प्रेमविवाह मान्य केल्यानंतर ती पतीसोबत आमच्या घरी येऊ लागली. दरम्यान, जावई पंकज आणि त्याचे कुटुंबीय हर्षिताचा हुंड्यासाठी छळ करू लागले, असा आरोप वडिलांनी केला आहे. हुंड्याच्या मागणीवरून झालेल्या मारहाणीबाबत तिने बराच काळ घरच्यांना काही सांगितलं नव्हतं. पती दारूच्या नशेत तिला मारहाण करायचा आणि हुंडा आणण्यास सांगायचा. हुंडा आणला नाही तर सोडून जाण्याची धमकीही द्यायचा. पंकजच्या कुटुंबीयांनीही हुंड्यासाठी छळ करून घटस्फोटासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली होती, असंही त्यांनी सांगितलं.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/KiyTmg3
No comments:
Post a Comment