मुंबई : राज्यातील नव्या सरकारच्या शपथविधीनंतर आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे वेध लागले असून, संख्याबळानुसार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला १०, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ७ कॅबिनेट खाती देण्याबाबत विचार सुरू असल्याचे समजते. भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आल्याने त्यांचा मंत्रिमंडळातील वाटाही तेवढाच मोठा असण्याचे संकेत आहेत.मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा गुरुवारी पार पडल्यानंतर आता महायुतीमधील तिन्ही घटक पक्षांच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार, याकडे तिन्ही पक्षांच्या नेत्यांचे लक्ष लागले आहे. संख्याबळानुसार भाजपला सर्वाधिक मंत्रिपदे मिळणार आहेत. त्या खालोखाल शिवसेनेला १० कॅबिनेट, तर पाच राज्यमंत्रिपदे देण्याबाबत चर्चा सुरू आहे. याशिवाय अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ७ कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्रिपदे देण्याबाबतही विचार सुरू आहे.महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्यसंख्या २८८ असून, मंत्र्यांची संख्या ही २८८ च्या १५ टक्के अर्थात ४३ असते. त्यामुळे मंत्रिमंडळात जास्तीत जास्त ४३ मंत्री होऊ शकतात. त्यातील किती कॅबिनेट मंत्री व किती राज्यमंत्री करायचे, याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हाती असतो. दरम्यान, शिवसेनेच्या १५ नेत्यांना मंत्रिपदे मिळणार असल्याची चर्चा असताना, पक्षाकडून ६ ते ७ नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचे सांगितले जाते. शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांमध्ये एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री) यांच्यासह उदय सामंत, दादा भुसे, शंभुराज देसाई, गुलाबराव पाटील, दिपक केसरकर, संजय राठोड, भरत गोगावले, अर्जुन खोतकर, संजय शिरसाट, प्रकाश सुर्वे आदींचा समावेश असे सांगितले जाते. दुसरीकडे, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य मंत्र्यांमध्ये अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, धनंजय मुंडे, अदिती तटकरे, संजय बनसोड, धर्मरामबाबा अत्राम, अनिल पाटील तसेच वाईचे मकरंद पाटील यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. याशिवाय राज्यमंत्री पदावर संग्राम जगताप आणि इंद्रनील नाईक, सना मलिक यांची वर्णी लागणार अशी चर्चा आहे. सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सगळी खाती आहेत. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे एकही खाते नाही. कमाल मंत्रिसंख्या ४३भाजप १८शिवसेना (१० कॅबिनेट, ५ राज्यमंत्री) १५राष्ट्रवादी (७ कॅबिनेट, ३ राज्यमंत्री) १०शिंदेंपुढे तीन खात्यांचा पर्यायएकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रालय मिळावे, यासाठी आग्रह धरला आहे. मात्र, गृहखात्याच्या बदल्यात एकनाथ शिंदे यांच्यासमोर भाजपने महसूल, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम खाते असे ३ पर्याय ठेवले आहेत. गृहखात्याइतकेच महत्त्वाचे खाते मिळवण्यासाठी शिवसेना आग्रही असल्याचे समजते.शिवसेनेचे संभाव्य मंत्री सामंत, दादा भुसे, शंभुराज देसाई, गुलाबराव पाटील, दीपक केसरकर, संजय राठोड, भरत गोगावले, अर्जुन खोतकर, संजय शिरसाट, प्रकाश सुर्वे.'राष्ट्रवादी'चे संभाव्य मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे, अदिती तटकरे, संजय बनसोड, धर्मरामबाबा अत्राम, अनिल पाटील, मकरंद पाटील. राज्यमंत्रिपदी संग्राम जगताप, इंद्रनील नाईक, सना मलिक.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/ehFufEg
No comments:
Post a Comment