मुंबई- तुरुंगातून सुटल्यापासून अल्लू अर्जुन आपल्या कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवत आहे. येणाऱ्या प्रत्येकाला तो आनंदाने भेटत आहे पण अभिनेत्याचे हे कृत्य पाहून सोशल मीडियावर लोक संतापले. तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही मृत महिलेच्या कुटुंबीयांना भेटला नाही किंवा जखमी मुलाला भेटायलाही आला नाही, याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावर आता अल्लू अर्जुनने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने मृत महिलेचा मुलगा श्री तेज यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. मृत महिलेच्या कुटुंबीयांना दिलेल्या वचनावर आपण ठाम असल्याचेही त्याने सांगितले. अल्लू अर्जुन म्हणाला की, तो मृत महिलेच्या कुटुंबाची घेतलेली जबाबदारी पूर्ण निभावणार आहे. मात्र कायदेशीर कारवाईमुळे त्याला मृत महिलेच्या कुटुंबीयांना आणि मुलाला भेटू दिले जात नाहीये. थिएटरमध्ये चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक संध्या थिएटरमध्ये 'पुष्पा २' च्या स्क्रिनिंगदरम्यान चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी अल्लू अर्जुनला १३ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. आपल्या पत्नीच्या मृत्यूला अभिनेता जबाबदार असल्याचा आरोप मृत महिलेच्या नवऱ्याने केला होता. त्यामुळे अल्लू अर्जुनविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तुरुंगातून सुटल्यानंतर अल्लू अर्जुन पीडितेला का भेटला नाही? अल्लू अर्जुन न सांगता चित्रपटगृहात पोहोचला त्यामुळे सिनेमागृहात त्याला पाहण्यासाठी लोक अगदी उतावीळ झाले आणि तिथे प्रचंड प्रमाणात चेंगराचेंगरी झाली. यात गुदमरल्याने अनेक जण बेशुद्ध झाले. यामध्ये रेवती नावाच्या महिलेचा मृत्यू झाला, तर तिचा मुलगा श्रतेज याची प्रकृती चिंताजनक आहे. श्रीतेजू यांची प्रकृती अजून चिंताजनक आहे. मात्र तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अल्लू अर्जुन तिच्या कुटुंबाला भेटायलाही गेला नाही, यावर सोशल मीडियावर बरीच टीका झाली. अल्लू अर्जुनने सांगितले कारण- आता अल्लू अर्जुनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर याबाबत एक पोस्ट केली आहे. त्यात त्याने लिहिले की, 'त्या दुर्दैवी घटनेनंतर सध्या उपचार घेत असलेल्या छोट्या श्रीतेजबद्दल मीही चिंतेत आहे. सध्या सुरू असलेल्या कायदेशीर कारवाईमुळे मला श्रीतेज आणि त्याच्या कुटुंबीयांना भेटू नका, असा सल्ला देण्यात आला आहे. 'श्रीतेज लवकर बरा होवो अशी इच्छा.... मी तुम्हाला लवकर भेटेन अल्लू अर्जुनने पुढे लिहिले की, 'माझ्या प्रार्थना त्याच्यासोबत आहेत आणि श्रेतेजच्या उपचाराचा खर्च मी उचलेन आणि त्याच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारेन, ही वचन मी निश्चितपणे पार पाडीन. तो लवकर बरा व्हावा,तसेच माझी श्रीतेज आणि त्याच्या कुटुंबियांशी लवकरात लवकर भेट व्हावी अशी मी प्रार्थना करतो.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/C2IKx6w
No comments:
Post a Comment