Breaking

Sunday, December 15, 2024

शपथविधीवेळी पहिल्यांदाच मंत्र्यांकडून आईच्या नावाचा उल्लेख, फडणवीसांचा नवा पायंडा https://ift.tt/hgAPI1s

नागपूर : महायुती सरकारमधील नेत्यांनी रविवारी १५ डिसेंबर रोजी नागपुरात मंत्रिपदाची शपथ घेतली. ३९ नेत्यांना फडणवीसाच्या मंत्रिमंडळात संधी मिळाली. या शपथविधी वेळी अनेक नेत्यांनी आपल्या स्वत:च्या आणि वडिलांच्या नावासह त्यांच्या आईचंही नाव घेत शपथ घेतली. एखाद्या मंत्रिपदाच्या शपथविधीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर आईच्या नावाचा गौरव होण्याची देशातील ही कदाचित पहिलीच घटना असेल.

अनेक मंत्र्यांनी शपथविधीवेळी वडिलांच्या नावासह आईचंही नाव घेतलं

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची आई सरिता आणि वडील गंगाधर राव या दोघांची नावं जोडून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. मुख्यमंत्र्यांनी आई-वडिलांची नावं शपथविधीवेळी घेतल्यानंतर इतर मंत्र्यांनीही वडिलांच्या नावासह आईचंही नाव घेत शपथ घेण्यास सुरुवात केली. यावेळी मंत्रिमंडळाच्या शपथविधीसोबतच बहुतांश मंत्र्यांच्या आईचीही नावं समोर आली.महाराष्ट्रात याआधी सर्वसाधारणपणे स्वतःच्या नावासोबत वडिलांचं नाव घेण्याची परंपरा होती आणि या परंपरेनुसार मंत्री आणि मुख्यमंत्री शपथ घेत होते. पण महाराष्ट्रात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेच्या शपथविधी सोहळ्यात आपल्या वडिलांसह आईचंही नावं घेतली.

राज्यपाल काय म्हणाले?

राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्ण यांनी अशा प्रकारचा त्यांचा हा पहिलाच अनुभव असल्याचं त्यांनी सांगितलं. एवढ्या मोठ्या संख्येने मंत्री शपथविधी वेळी आईच्या नावाचाही उल्लेख करत असल्याचं पाहाणं हा पहिलाच अनुभव असल्याचं ते म्हणाले.

३३ वर्षांनी नागपुरात पार पडला शपथविधी

दरम्यान, ५ डिसेंबर रोजी मुंबईत आझाद मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर अनेक दिवस मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. अखेर १५ डिसेंबर रोजी रविवारी महायुतीच्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांनी मंत्र्यांनी शपथ दिली. फडणवीसांच्या मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर अनेक प्रस्थापितांना डच्चू देण्यात आला आहे. तब्बल ३३ वर्षांनी मुंबईऐवजी नागपुरात शपथविधी पार पडला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/8ekvgH2

No comments:

Post a Comment