Breaking

Monday, December 2, 2024

वेटरची नोकरी ते १४ वर्ष फरसाणचं दुकान सांभाळलं; आज अभिनेता १०० कोटींचा मालक https://ift.tt/6ubjDYi

मुंबई : एकेकाळी आपल्या आईसोबत नमकीन आणि बेकरी चालवत असलेला फोटोतील चिमुकला आज इंडस्ट्रीत लोकप्रिय अभिनेते आहेत. केवळ अभिनेतेच नाही, तर ते डबिंग आर्टिस्ट म्हणूनही लोकप्रिय आहेत. आपल्या आईच्या पोटात असताना अभिनेत्याच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यांनी कधीही त्यांच्या वडिलांना पाहिलं नाही. त्यानंतर अभिनेत्याच्या आईनेच त्यांचं संगोपन करत त्यांना लहानाचं मोठं केलं.

कोण आहे फोटोतील चिमुकला?

फोटोत दिसणारा चिमुकला दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेते आहेत. २ डिसेंबर १९५९ मध्ये मुंबईतील एका ईराणी कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. पण त्यांच्या जन्माच्या सहा महिने आधीच त्यांच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यांना शीरीन, शेनाज आणि रोशन अशा तीन बहिणी आहेत.

लहानपणापासून आजाराने पीडित

बोमन इराणी यांना लहानपणापासून डिस्लेक्सिया नावाचा आजार होता. या आजारामध्ये शब्द ओळखण्यात, वाचण्यात आणि बोलताना समस्या येतात. पण बोमन यांनी आपल्या मेहनत आणि हिमतीने या आजारावर मात करत बॉलिवूड इंडस्ट्रीत आपलं नाव कमावलं.

वेटरचा कोर्स केला, आईसोबत बेकरी-नमकीनचं दुकान सांभाळलं

बोमन यांनी त्यांच्या शालेय शिक्षणानंतर मुंबईतील मीठीबाई कॉलेजमध्ये २ वर्ष वेटरचा कोर्स केला. त्यासोबतच त्यांच्या आईसोबत बेकरी-नमकीनचं दुकान सांभाळायचंही काम करायचे. पण काही वर्षांनी त्याच्या आईच्या अपघातानंतर त्यांनी नोकरी सोडून पूर्ण वेळ दुकान सांभाळलं. १४ वर्ष ते फरसाणचं दुकान सांभाळत होते. २०२१ मध्ये त्यांच्या आईचं जेरबानू ईरानी यांचं निधन झालं. कोर्स केल्यानंतर बोमन ताज महाल पॅलेसमध्ये काम करत होते. त्यासोबतच ते क्रिकेट आणि फूटबॉल मॅचचे फोटो काढून ते २०-३० रुपयांत विकत होते. हे काम त्यांनी त्यांच्या लग्नापर्यंत सुरू ठेवलं होतं.याच काळात ते फोटोग्राफर म्हणून काम करू लागले. शाळेपासूनच अभिनयाची आवड असलेल्या बोमन यांनी १९८१ ते १९८३ पर्यंत हंसराज सिद्धिया यांच्याकडून अभिनयाचे धडे धिरवले. या काळात अभिनेके एलीक पद्मसी यांनी बोमन ईराणी यांनी गाइड केलं. त्यानंतर हळूहळू ते थिएटरमध्ये अभिनय करू लागले आणि नंतर टीव्ही मालिकांपर्यंत पोहोचले. २००० मध्ये त्यांना टीव्हीवरील जाहिरातीमध्ये काम मिळू लागलं. त्याच दरम्यान त्यांना 'डरना मना है' या सिनेमात लहानशी भूमिका मिळाली. भूमिका लहान असली तरी त्यांच्या अभिनयाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्यानंतर एकामागे एक त्यांनी अनेक सुपरहिट सिनेमात काम केलं. 'मुन्नाभाई एमबीबीएस', '३ इडियट्स', 'मैं हूं ना', 'वीर जारा', 'लगे रहो मुन्नाभाई', 'खोसला का घोसला', 'हे बेबी', 'दोस्ताना', 'हाउसफुल', 'डॉन', 'संजू', 'डंकी' अशा अनेक सिनेमात त्यांनी कमालीची भूमिका साकारली. आज बोमन यांचं स्वत:चं प्रोडक्शन हाऊस आहे. तसंच ते अनेक ब्रँड्सचे ब्रँड ऍम्बेसेडरदेखील आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, बोमन ईराणी हे १०० कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/TogO9ds

No comments:

Post a Comment