मुंबई: दाक्षिणात्य सिनेविश्वातून हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे. कन्नड टीव्ही अभिनेत्री हिचा रविवारी, १ डिसेंबर रोजी धक्कादायक मृत्यू झाला असून, तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये संशयास्पद अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला. गचीबोवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या, कोंडापूर याठिकाणी असणाऱ्या श्रीराम नगर कॉलनीत ही घटना घडली. याठिकाणी या ३० वर्षीय अभिनेत्रीचा मृतदेह तिच्या अपार्टमेंटच्या छताला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. शेजाऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि अभिनेत्रीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी गांधी रुग्णालयात नेण्यात आला होता.
कन्नड टीव्ही इंडस्ट्रीमध्ये कमावले होते नाव
शोभिता 'ब्रह्मगंटू' आणि 'निनिदाले' अशा काही टेलिव्हिजन मालिकांमधील भूमिकांसाठी प्रसिद्ध होती. तिने ठराविक चित्रपटांमध्येही काम केले. कर्नाटकमधील हासन या जिल्ह्यातील सकलेशपूर याठिकाणची ती रहिवासी आहे. गेल्यावर्षीच तिने लग्न झाले होते. लग्नानंतर मात्र तिने मनोरंजन विश्वातून ब्रेक घेतला होता आणि ती पती सुधीरसोबत हैदराबादमध्ये राहत होती.माहेरी आणण्यात आला अभिनेत्रीचा मृतदेह
शोभिताने असे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत अद्याप ठोस कारण समजू शकलेले नाही. गचीबोवली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिचा मृत्यू कशामुळे झाला असावा, याबाबत तपास सुरू केला आहे. सध्या पोलिसांकडून तिचे कुटुंबीय, मित्र आणि शेजाऱ्यांचे जबाब नोंदवले जात आहेत. शोभिताचा मृतदेह बेंगळुरूला नेण्यात आला असून, त्याठिकाणी तिच्या माहेरचे सदस्या वास्तव्यास आहेत.शोभिताचे चाहते-कुटुंबीय शोकाकुल
शोभिता सोशल मीडियावर फारशी सक्रिय नव्हती. काही आठवड्यांपूर्वीच्या तिच्या पोस्ट आहेत. अभिनेत्रीने तिच्या आगामी चित्रपटाविषयीही काही पोस्टमधून भाष्य केले होते. आता अभिनेत्रीने अशाप्रकारे जगाचा निरोप घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे, तिचे संपूर्ण कुटुंबीय शोकाकूल आहेत. मनोरंजन विश्वालाही मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर तिला श्रद्धांजली अर्पण करणाऱ्या असंख्य पोस्टही करण्यात आल्या आहेत. तिच्या इन्स्टाग्रामवरील तिच्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट करत या घटनेनंतर शोक व्यक्त केला.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/vos5PyK
No comments:
Post a Comment