मुंबई : अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण या सेलिब्रिटी कपलने त्यांच्या लेकचं नाव दुआ असल्याचं दिवाळीत सांगितलं होतं. आता सोशल मीडियावर सध्या रणवीर - दीपिकाचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दोघांच्या कडेवर एक बाळ दिसत आहे. व्हायरल फोटोमध्ये दोघांनी आपल्या लेकीचा चेहरा सर्वांना दाखवला असल्याचा दावा केला जात असून दोघांसोबत दिसत असलेलं बाळ त्यांची मुलगी दुआ असल्याचं बोललं जात आहे. मात्र विश्वास न्यूजच्या पडताळणीत दीपिका - रणवीरच्या बाळाचे फोटो म्हणून होणारी पोस्ट खरी नसून आर्टिफिशिअल इंटेलिजेन्सद्वारे बनवण्यात आल्याचं समोर आलं आहे.
व्हायरल पोस्टमध्ये काय लिहिलंय?
फेसबुक पेज Starreallife ने व्हायरल फोटो २१ डिसेंबर रोजी शेअर करत लिहिलंय, की “Deepika Padukone Ranveer Singh With Baby Dua Enjoying Winter.”ची .पडताळणीत काय समोर?
व्हायरल फोटोचा तपास करण्यासाठी विश्वास न्यूजने फोटो काळजीपूर्वक तपासले. हे फोटो पाहताना अतिशय सॉफ्ट आणि आर्टिफिशिअल दिसत होते. या फोटोचा तपास करण्यासाठी विश्वास न्यूजने एक-एक फोटो एआय इमेज डिटेक्शन टूलवर तपासले.पहिला फोटो
पहिला फोटो एआय इमेज डिटेक्शन टूल हाइव्ह मॉडरेशनद्वारे तपासला, ज्यात फोटो AI द्वारे बनवण्यात आल्याची शक्यता ९९.४ टक्के सांगण्यात आली.दुसरा फोटो
दुसरा फोटोही एआय इमेज डिटेक्शन टूल हाइव्ह मॉडरेशनद्वारे तपासला. त्यात फोटो एआयने तयार केल्याची शक्यता ९८.८ टक्के असल्याचं सांगण्यात आलं.तिसरा फोटो
तिसरा फोटो देखील एआय डिटेक्शन टूल हाइव्ह मॉडरेशनने तपासल्यावर फोटो एआयने तयार केल्याची शक्यता ९९.७ टक्के असल्याचं सांगण्यात आलं. यानंतर, विश्वास न्यूजने कीवर्डच्या मदतीने शोधलं, की रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणने यांनी त्यांच्या मुलीचा दुआचा चेहरा सर्वांसमोर दाखवला आहे का? , या दोघांनी एका खाजगी बैठकीत त्यांची मुलगी दुआ हिच्याशी पापाराझीची ओळख करून दिली होती, परंतु त्यावेळी फोटो क्लिक करण्यास सक्त मनाई होती.मुंबईत बॉलीवूड बीट कव्हर करणाऱ्या दैनिक जागरणच्या वरिष्ठ पत्रकार स्मिता श्रीवास्तव यांनी सांगितलं, की “रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी एका खाजगी गॅदरिंगमध्ये त्यांची मुलगी दुआशी पापाराझींची ओळख करून दिली होती, परंतु त्यावेळी फोटो काढण्यावर कडक बंदी होती. दुआचे कोणतेही फोटो सार्वजनिकरित्या उपलब्ध करण्यात आलेले नाहीत.”दीपिका पादुकोणच्या मुलीसंबंधी इतर फॅक्ट चेक रिपोर्ट्स पाहता येतील.निष्कर्ष
दीपिका - रणवीरने त्यांच्या लेकीचा दुआचा चेहरा सर्वांसमोर दाखवला असल्याचा सोशल मीडियावर व्हायरल होणारा दावा खोटा असल्याचं समोर आलं आहे. व्हायरल फोटो AI च्या मदतीने तयार करण्यात आले आहेत. सार्वजनिकरित्या कुठेही दुआचे फोटो उपलब्ध नाहीत.(This story was originally published by , and republished by MT as part of the Shakti Collective.)from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/k6gUJzn
No comments:
Post a Comment