विनायक राणे : पहिल्या दोन सामन्यांतील दारूण पराभवांमुळे भारतीय संघाची ऑस्ट्रेलियातील मालिकेत वाताहत झाली आहे. किमान ०-३ असा ‘व्हाइट वॉश’ टाळण्यासाठी हरमनप्रीत आणि कंपनी आज, बुधवारी यजमान ऑस्ट्रेलियाशी दोन हात करेल. पुढील वर्षी आयसीसीच्या महिला वनडे क्रिकेट वर्ल्ड कपचे आयोजन होत आहे. त्या दृष्टिने आपल्या चुका दुरुस्त करण्याचा भारतीय संघ प्रयत्न करणार आहे. वर्ल्ड कपसारख्या महत्त्वाच्या स्पर्धेच्या तयारीच्या दिशेने भारताने अद्याप पाऊलही टाकलेले नाही हे अलीकडच्या कामगिरीवरून दिसते. या मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात भारतीय संघ फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तीनही आघाड्यांवर फोल ठरला. त्यात दुसऱ्या वनडे सामन्यात भारतावर १२२ धावांनी विक्रमी पराभवाची नामुष्की आली. या लढतीत भारताच्या फलंदाजांनी थोड्याथोड्या अंतराने बरी कामगिरी केली; पण ३७२ धावांच्या आव्हानाचा विचार करता संपूर्ण सामन्यात भारतीय खेळाडूंमध्ये जिंकण्याची इर्ष्याच दिसली नाही.
संघाची डोकेदुखी
-हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना या अनुभवी फलंदाजांचे अपयश संघव्यवस्थानाच्या चिंतेत भर घालणारे-स्मृतीची ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध शतकी खेळी. ऑस्ट्रेलियातील दोन वनडेंमध्ये मिळून फक्त १७ धावा-चांगल्या सुरुवातीचे मोठ्या खेळीत रुपांतर करण्यात हरमनप्रीत अपयशी. तिच्या कर्णधारपदावरही गदा येण्याची शक्यता-सतत अपयशी ठरणाऱ्या शेफाली वर्माला संघाबाहेर केले, पण तिच्या अनुपस्थितीत फक्त रिचा घोषलाच छाप (दुसऱ्या वनडेत अर्धशतक) पाडता आली-पहिल्या सामन्यात फक्त चार फलंदाजांना दोन आकडी धावसंख्या करता आली होती-चेंडूवर नियंत्रण मिळवण्यात भारतीय गोलंदाज अपयशी-सुमार क्षेत्ररक्षणामुळे गोलंदाजांच्या अडचणींमध्ये वाढभारत वि. ऑस्ट्रेलिया
ठिकाण : वॅका मैदान, पर्थवेळ : सकाळी ८.५०पासूनखेळपट्टीचा अंदाज : वॅकाची खेळपट्टी गोलंदाजांना सहाय्यक. वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व दिसण्याची शक्यता. संयम बाळगल्यास फलंदाजांना यश मिळण्याची शक्यता. आमने-सामने : ५५ वनडेंमध्ये ऑस्ट्रेलियाचे भारतावर ४५-१० असे वर्चस्वहवामानाचा अंदाज : उष्ण वातावरण. पावसाचा अंदाज नाही.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/5a0EcRw
No comments:
Post a Comment