Breaking

Tuesday, December 17, 2024

घटनादुरुस्तीवरुन अमित शहा राज्यसभेत गरजले, 'खोट्या गोष्टींचा गठ्ठा' म्हणत काँग्रेसचाही प्रहार https://ift.tt/iI3fsvS

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री अमित शहांनी मंगळवारी राज्यसभेतील संविधानावरील चर्चेवर प्रत्युत्तरादाखल भाषण केले. यावेळी त्यांनी घटनादुरुस्तीवरुन काँग्रेसवर जळजळीत टीका केली. यावरून आता काँग्रेस नेत्यांनी अमित शहांना 'खोट्या गोष्टींचा गठ्ठा' म्हणत फटकारले आहे. संविधानावरील चर्चेदरम्यान आपल्या उत्तरात अमित शहा म्हणाले की, गेल्या ७५ वर्षांत काँग्रेसने संविधानाच्या नावाने फसवणूक केली. त्यांनी केवळ आपल्या पक्षालाच खाजगी संपत्ती मानली नाही तर देशाच्या संविधानालाही त्यांनी आपली खाजगी संपत्ती मानली आहे. तर अमित शहांनी काँग्रेस नेहमीच ते हरल्यावर निवडणुकीत चुका शोधते, अशा शब्दांत फटकारले देखील आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या राज्यसभेतील भाषणावर काँग्रेस प्रमुख मल्लिकार्जुन खर्गेंनी प्रतिक्रिया देत म्हणाले की, केंद्रीय मंत्री आंबेडकर स्मारकाबद्दल खोटे बोलले आहेत. एएनआयशी संवाद साधताना खर्गे म्हणाले, 'आज जे काही गृहमंत्री म्हणाले ते सत्यापासून दूर आहे, ते आंबेडकरांच्या पुतळ्याच्या उदाहरणार्थ खोटे बोलले आहेत. स्मारक काय त्यांच्या (भाजप) कार्यकाळात बांधला होता का? सगळं खोटं आहे. खोट्याने लोकांना वळवण्याचा ते प्रयत्न करत आहेत आणि ते फार काळ चालणार नाही. ते फक्त पंतप्रधान मोदींची स्तुती करायला संसदेत आले होते.'दरम्यान काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनीही खोचक प्रतिक्रिया दिली आहे. 'एक देश एक निवडणूक विधेयक तर मंजूर झाले पण राज्यसभेतील ती स्थिती एक वक्ता अनेक श्रोते अशीच होती. शहांच्या ९० मिनिटांच्या भाषणात त्यांनी केवळ काँग्रेसलाच निशाण्यावर ठेवले.' असे जयराम रमेश म्हणाले. यासोबतच काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी यांनी केंद्रीय मंत्र्यांचे भाषण हे केवळ 'खोट्या गोष्टींचा गठ्ठा' असल्याची खोचक टीका केली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/NRL2zu7

No comments:

Post a Comment