Breaking

Tuesday, December 17, 2024

अखेरच्या २ षटकात हव्या होत्या ३४ धावा, १९व्या षटकात पाहा काय घडले; मॅचा निकालच बदलला https://ift.tt/n79LpcR

कॅनबेरा: ऑस्ट्रेलियाचा 32 वर्षीय अष्टपैलू डॅनियल सॅम्सने मध्ये अशी विस्फोटक खेळी केली की प्रेक्षक बघतच राहिले. स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात सिडनी थंडरकडून खेळताना स्फोटक फलंदाजाने ॲडलेड स्ट्रायकर्स संघाच गोलंदाजांची दाणादाण उडवली. डॅनियल सॅम्सने 25 वर्षीय लेगस्पिनर लॉयड पोपच्या एका षटकात 31 कुटल्या आणि सामन्याचा निकालच बदलवला. शेवटच्या दोन षटकात 34 धावा हव्या होत्याकॅनबेराच्या मनुका ओव्हल येथे झालेल्या लढतीत सिडनी थंडरने धमाकेदार विजय मिळून दिला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ॲडलेड स्ट्रायकर्स संघाने 8 गडी गमावून 182 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात सिडनी थंडरचा स्कोअर १८ षटकांत 7 बाद 149 होता आणि विजयासाठी शेवटच्या दोन षटकांत 34 धावांची गरज होती. ॲडलेड स्ट्रायकर्सने 19व्या षटकात लेगस्पिनर लॉयड पोपला आक्रमणात परत आणले, ज्याने त्याच्या तीन षटकांत केवळ 17 धावा देऊन एक बळी घेतला. पण या षटकात त्याच्या अडचणी वाढणार होत्या.सॅम्सने एका षटकात 31 धावा ठोकल्याडॅनियल सॅम्सने 19 व्या षटकात वादळी फलंदाजी केली. या ओव्हरमध्ये सॅम्सने पहिल्या दोन चेंडूंवर षटकार ठोकून लॉयड पोप आपला इरादा सांगितला. पुढचा चेंडू वाईड होता. त्यानंतर डॅनियल सॅम्सने एक्स्ट्रा कव्हरवर चौकार मारला आणि नंतर स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार मारला. त्यानंतर, त्याने कव्हर क्षेत्रावर दोन चौकार मारले. अशा प्रकारे एका षटकात 31 धावा झाल्या. सिडनी सामना सहज जिंकलासॅम्स १९व्या षटकात केलेल्या वादळी फलंदाजीमुळे शेवटच्या षटकात सिडनी थंडरला विजयासाठी तीन धावांची गरज होती आणि पहिल्या चेंडूवर एक विकेट गमावल्यानंतरही सिडनीने दोन गडी राखून विजय मिळवला. सामनावीराचा पुरस्कार मिळाला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/ehOmy7L

No comments:

Post a Comment