Breaking

Tuesday, December 24, 2024

रोहित शर्माला चौथ्या कसोटीपूर्वी दुखापत कशामुळे झाली होती, समोर आलं अखेर खरं कारण... https://ift.tt/iv8kxJg

विनायक राणे : चौथ्या कसोटीपूर्वी रोहित शर्माला दुखापत झाली होती. रोहित शर्मा चौथ्या कसोटीसाठी सराव करत असताना गुडघ्यावर चेंडू आदळला होता. त्यानंतर रोहित शर्माने सराव केला नव्हता. पण रोहित शर्माला दुखापत का झाली, याचे खरे कारण आता समोर आले आहे. गावस्कर-बॉर्डर करंडक कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्याआधी सरावासाठी मेलबर्न क्रिकेट मैदानातील (एमसीजी) वापरलेली खेळपट्टी दिल्याने भारतीय क्रिकेट संघाने सोमवारी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच रोहित शर्माला रविवारी सरावादरम्यान झालेल्या दुखापतीसाठीही भारतीय संघाने खेळपट्टीलाच जबाबदार धरले आहे. मेलबर्न मैदानाच्या ‘क्युरेटर’नी स्वतःची बाजू मांडताना नियमाकडे बोट दाखवत सहाजिकच हात वर केले आहेत. ‘आम्ही फक्त क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या नियमांचे पालन करत आहोत’, अशी प्रतिक्रिया ‘क्युरेटर’नी दिली आहे. या खेळपट्टीवर चेंडूला असमान उसळी मिळत असल्याचे भारतीय संघव्यवस्थापनाचे म्हणणे आहे. भारतीय संघाच्या सहाय्यक वर्गातील थ्रोडाऊन तज्ज्ञ दयानंद गरानी यांच्यासह सराव करताना रोहितच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर रोहितने सराव केला नाही. त्याच्या गुडघ्याला सूजही आली होती. यामुळे रविवारी रात्रीही रोहितच्या गुडघ्याला बर्फाने शेकवावे लागले होते. यामुळेच नाराज भारतीय संघ व्यवस्थापन खेळपट्टीला जबाबदार धरत आहे. भारतीय संघाने दोन महिन्य़ांपूर्वीच आपल्या सरावाचे नियोजन मेलबर्न क्रिकेट मैदानाच्या ‘क्युरेटर’ना पाठविले होते. मात्र क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या नियमाचा संदर्भ देत भारतीय संघाला वापरलेल्या खेळपट्टीवरच सराव करण्यास सांगण्यात आले. ‘नियमानुसार आम्ही कसोटीच्या तीन दिवसआधीच संघांना सरावासाठी नवी खेळपट्टी देतो. या नियमाचे पालन करत आम्ही खेळपट्टी तयार करतो तीच तीन दिवसांपूर्वी. एखादा संघ तीन दिवस आधीच येथे आला तर त्याला सरावासाठी जुनी खेळपट्टीच मिळते’, असे मेलबर्न मैदानाचे ‘क्युरेटर’ मॅट पेज यांनी सांगितले.भारतासाठी हा चौथा सामना सर्वात महत्वाचा असणार आहे. भारताने जर हा चौथा सामना जिंकला तर त्यांना मालिकेत २-१ अशी आघाडी घेता येऊ शकते. त्यामुळे भारतासाठी हा सामना महत्वाचा असणार आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/wMzYLrQ

No comments:

Post a Comment