रायपूर: गर्लफ्रेण्ड नाराज झाल्याने एक अल्पवयीन विद्यार्थी इतका तणावात गेला की, त्याने आपली जीवनयात्रा संपवली आहे. गर्लफ्रेण्डला व्हिडिओ कॉल करुन या अल्पवयीन मुलाने गळफास घेत आपलं जीवन संपवलं. छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील भिलाई, सुपेला पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली आहे. येथे १७ वर्षीय विद्यार्थ्याने आपलं आयुष्य संपवलं आहे.
गर्लफ्रेण्डला व्हिडिओ कॉल अन्...
मृत मुलगा हा ११वीत शिकत होता. तो गर्लफ्रेण्डसोबत व्हिडिओ कॉलवर बोलत असताना त्याने गळफास लावून घेतल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आणि प्रकरणाचा तपास सुरू केला.तपासादरम्यान, पोलिसांना कळाले की, काही दिवसांपूर्वी या विद्यार्थ्याने त्याच्या गर्लफ्रेण्डला त्याच्या वर्गमैत्रिणीबद्दल सांगितले होते. त्यावरुन त्याची गर्लफ्रेण्ड चिडली आणि दोघांमध्ये वाद झाला. गर्लफ्रेण्डने गोपालला सोशल मीडियावर ब्लॉक केले. यानंतर गोपाल डिप्रेशनमध्ये गेला.गर्लफ्रेण्डला वर्गमैत्रिणीबद्दल सांगितल्याने ती नाराज झाली होती
मृत मुलाता भाऊ लोकेश साओ यांनी सांगितले की, अल्पवयीन मुलाची बिहारमधील एका मुलीशी मैत्री होती. जिच्याशी तो अनेकदा सोशल मीडियावर बोलत असे. जेव्हा त्याने त्याच्या शाळेतील मैत्रिणीबद्दल गर्लफ्रेण्डला सांगितलं तेव्हा तिला खूप राग आला. तिने त्याला सोशल मीडियावर ब्लॉग केले. त्यामुळे तो खूप तणावात होता. त्यातूनच त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. या मुलाच्या अशा अचानक निघून जाण्याने त्याचे कुटुंबीय आणि मित्रांना धक्का बसला आहे. सुपेला पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून घटनेचा गांभीर्याने तपास सुरू आहे.पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला
या घटनेबाबत एएसी सुखनंदन राठोड यांनी सांगितले की, अल्पवयीन मुलाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरु करण्यात आला आहे. यामध्ये जे काही तथ्य समोर येईल, त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/SR9rF68
No comments:
Post a Comment