Breaking

Monday, December 23, 2024

विराटचा तो नियम भारतात चालेल पण ऑस्ट्रेलियात लागू पडत नाही, मीडियाने कोहलीला धारेवर धरले https://ift.tt/rK6TStX

: ऑस्ट्रेलियाच्या मीडियाने आता विराट कोहलीला चांगलेच धारेवर धरले आहे. विराट कोहलीचा तो नियम भारतात लागू होत असेल पण ऑस्ट्रेलियात होऊ शकणार नाही, असे स्पष्ट मत ऑस्ट्रेलियाच्या मीडियाने व्यक्त केले आहे.

विराटबरोबर असं का केलं जात आहे....

पाहुण्या क्रिकेट संघातील खेळाडूंवर विविध माध्यमांतून टीका करत त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचे डावपेच ऑस्ट्रेलियातील मीडिया करत असते. आता त्यांच्याकडून लक्ष्य झाला आहे तो भारताचा माजी कर्णधार विराट कोहली. त्यामुळे विराटचे खेळण्यावरील लक्ष विचलित व्हावे, यासाठी त्याच्यावर ही टीका केली जात असल्याचे म्हटले जात आहे.

नेमकं प्रकरण आहे तरी काय...

भारतीय संघाबरोबर विराट कोहली मेलबर्नला दाखल झाला. विराट कोही यावेळी आपल्या मुलांबरोबर दाखल झाला होता. विमानतळावर आपल्या लहान मुलांचे फोटो किंवा व्हिडीओ काढणाऱ्या महिला पत्रकाराला हटकल्याबद्दल ऑस्ट्रेलियातील मीडियाने तिखट शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच एका पत्रकाराने या घटनेस 'विराटची दादागिरी', असे संबोधले आहे. चौथ्या सामन्यासाठी भारतीय संघ मेलबर्न विमानतळावर दाखल झाला तेव्हा हा प्रसंग घडला. विराटसह त्याची पत्नी अनुष्का शर्मा आणि दोन मुलेदेखील होती.

ऑस्ट्रेलियाच्या मीडियाने काय म्हटले आहे, जाणून घ्या....

आपली मोठी मुलगी आणि धाकट्या मुलाचे फोटो किंवा व्हिडीओ काढू नये, अशी विनंती विराट कोहलीने भारतीय छायाचित्रकारांना केली आहे. मात्र तो नियम ऑस्ट्रेलियात लागू होत नाही, असे इथल्या मीडियाचे म्हणणे आहे. येथे सेलिब्रेटींचे व्हिडीओ आणि फोटो काढण्यावर कोणतीही बंधने नाहीत. त्यामुळे आम्ही ऑस्ट्रेलियात त्यांचे फोटो काढू शकतो, असे ऑस्ट्रेलियाच्या मीडियाने आता म्हटले आहे.विराट कोहलीने आपल्या दोन्ही मुलांचे फोटो कोणालाही काढायला दिले नव्हते. भारतामध्ये काही जणांनी असा प्रयत्न केला होता, पण विराट त्यांच्यावर चांगलाच भडकला होता. त्यामुळे भारतात ही गोष्ट त्यापुढे कोणी केली नाही. पण ऑस्ट्रेलियात ही गोष्ट घडल्यावर मात्र आता तेथील मीडियाने वेगळेच वळण दिले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/wAvpYxN

No comments:

Post a Comment