Breaking

Sunday, December 22, 2024

नो रिस्क! ऑनस्क्रिन किंसिंग सीन देण्यापूर्वी बायकोच्या आईवडिलांची परवानगी घेतो हा अभिनेता https://ift.tt/upa5L0W

मुंबई- हिंदी टेलिव्हिजन मधील हँडसम हंक म्हणून अभिनेता याला ओळखले जाते. रवीने आपल्या डॅशिंग लुक आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकून घेतली आहेत. त्याने अनेक मालिकांमध्ये आपली अभिनय क्षमता सिद्ध केली. आता तो अभिनेत्यासोबतच एक उत्तम निर्माता देखील बनला आहे. रवी दुबे ने आपल्या पत्नी सरगून मेहता सोबत प्रोडक्शन कंपनी उभी केलीये याद्वारे ते दोघे अनेक मालिकांचे निर्माते म्हणून काम करतात. आज रवि दुबे त्याचा ४१ वा वाढदिवस साजरा करतोय. आपल्या मुलाने इंजिनियर व्हावे असे रवीच्या वडिलांची इच्छा होती पण त्याचे शिक्षणात मन होते. इंजिनीयर चे शिक्षण घेण्यासाठी जेव्हा तो मुंबईत आला तेव्हा त्याला आपली खरी आवड समजून आली. या काळात त्यांनी बरेच चढ उतार पाहिले. या काळात त्याच्या मनात आत्महत्याचे विचार पिंगा घेत होते. तेव्हा तो स्वतःला समजावायचा की कोणतेही संकट मोठे नसते. परिस्थिती कधीही बदलू शकते त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. त्यानंतर रवी दुबे च्या स्ट्रगलच्या काळात त्याचा रूम मेट इव्हेंट ऑर्गनाईज करायचा तेव्हा त्याने त्याला जूनियर आर्टिस्ट म्हणून काम करणार का? त्यासाठी पाचशे रुपये मिळतील असं सांगितलं आणि रवीने लगेच होकार दिला. ज्या प्रोडक्शन साठी त्यांनी काम केलेले त्याच प्रोडक्शन साठी १० वर्षांनी तो लीड हिरो म्हणून सास बिना ससुराल या सुपरहिट टीव्ही शो मध्ये दिसलेला आणि मग त्याच्यापुढे त्याला बऱ्याच ऑफर येऊ लागल्या. रवी दुबेने अभिनेत्री सरगुन मेहतासोबत लग्न केले आहे. पडद्याशिवाय रवी आणि सरगुनच्या जोडीला खऱ्या आयुष्यातही चाहत्यांचे प्रचंड प्रेम मिळते. दोघांची केमिस्ट्रीही अफलातून आहे. काही काळापूर्वी सरगुनने तिचा पती रवी दुबेच्या किसिंग सीनबद्दल उघडपणे बोलून एक धक्कादायक खुलासाही केला होता. सरगुन मेहताने एका मुलाखतीदरम्यान एका वेब सीरिजमध्ये रवी दुबे आणि निया शर्मा यांच्यातील किसिंग सीनबद्दल सांगितले होते. नियाने रवीला बेस्ट किसर म्हटले होते. जेव्हा अभिनेत्रीला विचारण्यात आले की नियाने रवीला बेस्ट किसर म्हटले, यावर तुझे काय म्हणणे आहे? या प्रश्नावर आधी सरगुन लाजली आणि नंतर म्हणाली की तिला यात काही अडचण नाही. सरगुन पुढे म्हणाली की, 'आम्ही दोघांनी तो सीन एकत्र पाहिला आणि मी त्याला सांगितले की जर स्क्रिप्टची मागणी असेल तर तू ते कर आणि मला वाटते की तू तुझं काम नेहमीच सर्वोत्तम करावं. सरगुननेही यावेळी खुलासा केला की, रवीला मी परवानगी दिलेली तरी तो पुढे मला म्हणाला की मला माझ्या आई-वडिलांची परवानगी घ्यावी लागेल, असे सांगितले.आधी मला वाटले की तो त्याच्या कुटुंबाबद्दल बोलत आहे, नंतर मला समजले की तो माझ्या पालकांबद्दल बोलत आहे. हे रवीने मला सांगितल्यावर मीही त्याला नकार दिला. कारण मी त्याला हो म्हटलं होतं. सरगुनने शेवटी सांगितले की, माझ्या नकारानंतरही रवी सहमत झाला नाही आणि त्याने माझ्या कुटुंबीयांना फोन करून औपचारिकपणे यासाठी परवानगी मागितली. हे ऐकून माझ्या आई-वडिलांनाही आश्चर्य वाटले आणि म्हणाले, बेटा, हे बघ तुझे काम आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/ng8qx4c

No comments:

Post a Comment