विनायक राणे : जगज्जेतेपद सामन्यात सोमवारी जगज्जेत्या डिंग लिरेन याने आव्हानवीर डी. गुकेशला बाराव्या डावात पराभूत केले. यामुळे सामना पुन्हा बरोबरीत आला असून सध्या प्रतिस्पर्ध्यांच्या नावावर प्रत्येकी ६-६ असे गुण आहेत. रविवारच्या डावात ज्याप्रमाणे डिंगने केलेल्या घोडचुकांचा फायदा घेत गुकेशने विजयाची नोंद केली होती, सिंगापूर येथे सुरू असलेल्या या सामन्यात सोमवारी मात्र सहज, सुंदर चाली खेळत डिंग लिरेनने गुकेशवर मात केली. ज्याप्रमाणे रविवारी गुकेशने ‘रेटी’ पद्धतीने डावाला सुरुवात केली होती, तसेच सोमवारी डिंगने ‘रेटी’ पद्धतीचा अवलंब करत डावाला सुरुवात केली. रेटीपद्धतीमध्ये खेळाडूला स्वतःच्या मनाप्रमाणे खेळण्याचे स्वातंत्र्य मिळते. या प्रकारात अनिवार्य चाली (‘फोर्स मूव्ह’) कमी होतात. डाव जसा उत्तरोत्तर रंगत गेला तशी ‘ई ४’, ‘ई ५’ अशी ती स्थिती निर्माण झाली त्यात डिंगची हुकमत दिसली. आततायीपणा टाळत त्याने शिस्तबद्ध पद्धतीने मोहरे पुढे आणले. गुकेशला डिंगच्या या चाली कळू शकल्या नाहीत. गुकेश वजिराच्या बाजूला आपली प्यादी आणि मोहरे नेत होता. पुढे ‘सेंटर’मध्ये डिंगने ‘ब्रेक’ अन् विसाव्या चालीतच गुकेश हरणार, असे अंदाज येऊ लागला. त्यानंतरही डिंगने राजाच्या बाजूला आक्रमक चाली सुरू ठेवल्या होत्या. गुकेशवर बिकट परिस्थिती आली होती; पण त्याने वजिराच्याबाजूने खेळण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. डिंग लिरेनचे प्यादे सातव्या रँकमध्ये आले आणि शेवटी अत्यंत सुंदर असा हत्तीचा बळी देऊन डिंग लिरेनने हा डाव संपवला. गुकेश म्हणाला की, " डावाच्या उत्तरार्धात सरशी साधण्याच्या बऱ्याच संधी मी गमावल्या. सहाजिकच खूप निराश झालो आहे. सुदैवाने उद्या विश्रांतीचा दिवस येतो आहे. मी पुढील डावांत नक्कीच उजवा खेळ करण्याचा प्रयत्न करेन. " विजयानंतर डिंग म्हणाला की, " रविवारी माझा पाय खोलता होता. त्यावेळी सूस्थितीत असूनही मी नंतर चुका केल्या होत्या. त्या मी सोमवारी टाळल्या. प्रतिस्पर्ध्यावर दडपण आणायचे अन् मग बाजी हातातून निसटू द्यायची नाही, एवढे मनात ठेवले होते. "
ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे यांच्या नजरेतून
-हा डाव एकतर्फी झाला. रविवारच्या पराभवानंतर डिंग सोमवारी खांदेपाडून खेळेल असा अंदाज मात्र फोल ठरला-गुकेशची आघाडी क्षणिक ठरली. स्वतःला कल्पना नसलेल्या (वेगळ्या) चाली खेळण्याचा फटका गुकेशला बसला-डिंगच्या चालींचे गुकेशला आकलनच झाले नाही, डिंगच्या खेळात ९७, ९८ टक्के अचूकता दिसली. -थेंबे, थेंबे तळे साचे, अशा पद्धतीने डिंगची डावावर पकड -मी तर म्हणेन त्याने तळे पूर्ण साचल्यावर शिकारीला सुरुवात केली, ज्यामुळे त्याला जिंकणे सोपे गेले-काळ्या मोहऱ्यांनिशी खेळणारा गुकेश पहिल्यापासून मागे पडत गेला-आज जिंकलो तरच सामन्यात निभाव लागू शकतो, या इर्ष्येने डिंगचा खेळ -गुकेशला पहिल्यापासून सूर गवसला नाही, पहिल्या चालीचा दुसऱ्या चालीशी संबंध नसावा, असा खेळ गुकेशकडून झाला-डिंगच्या खेळात समन्व, तर गुकेशकडून नेमका समन्वयात अभावfrom Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/rJaRlUH
No comments:
Post a Comment