Breaking

Monday, December 30, 2024

नववर्षाचे बंदोबस्तात स्वागत, मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी १५ हजार पोलिस तैनात https://ift.tt/u9YHIA8

म.टा.प्रतिनिधी, मुंबई : नवीन वर्षाच्या स्वागतावेळी, अर्थात ३१ डिसेंबरला पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे. आठ अपर पोलिस आयुक्त, २९ पोलिस उपायुक्त, ५३ सहायक पोलिस आयुक्त, दोन हजार १८४ पोलिस अधिकारी आणि १२ हजार ४८ पोलिस अंमलदार गस्तीवर असणार आहेत. राज्याचे गृह राज्यमंत्री (शहर) योगेश कदम यांनी सोमवारी याबाबत माहिती दिली.नववर्षाच्या स्वागतासाठी दरवर्षी मोठ्या उत्साहाने नागरिक बाहेर पडतात. मुंबईत गेट वे ऑफ इंडिया, तसेच ठिकठिकाणच्या चौपाट्यांवर कुटुंबे मोठ्या प्रमाणावर जमतात. या सर्व पार्श्वभूमीवर ठेवण्यात येणाऱ्या पोलिस बंदोबस्ताबाबत कदम यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. रेव्ह, खासगी पार्ट्यांमध्ये अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर कडक नजर ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.‘शहरातील महत्त्वांच्या चौकात नाकाबंदी असणार आहे. जगातील सुरक्षित शहर म्हणून मुंबईची ओळख आहे. ती प्रतिमा पोलिस कायम ठेवतील हा विश्वास आहे. मुख्यमंत्र्यांनी पोलिस प्रशासनाला सुरक्षेबाबत सूचना दिल्या आहेत. नववर्षाच्या सुरक्षेसाठी १२ हजार अंमलदार असतील, तर महिला पोलिसही तैनात आहेत’, असे कदम म्हणाले. ‘नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकरांनी कोणतेही दडपण बाळगू नये. पोलिस आपल्या सुरक्षेसाठी तयार आहेत’, असे आवाहन त्यांनी केले. ‘वाहतूक विभागाकडून गाडी चालवणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवली जाणार आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/fwtoMVB

No comments:

Post a Comment