Breaking

Thursday, December 5, 2024

रोहित शर्मासोबत डेटिंगच्या चर्चा; बोल्ड फोटोने उडालेली सोशल मीडियावर खळबळ, लग्नाच्या एका वर्षातच घटस्फोट https://ift.tt/Xl6Z8Og

मुंबई - सलमान खानचा लोकप्रिय टीव्ही रिऍलिटी शो बिग बॉस ७ मधील वादग्रस्त स्पर्धक कायम चर्चेत असते. अशातच ती काही वर्षांपूर्वी एका खास कारणामुळे चर्चेत आलेली. तेव्हा सोफियाने भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माबद्दल दावा केला होता. मीडिया रिपोर्टनुसार, सोफिया तिच्या आयुष्यावर एक पुस्तक लिहिणार होती. या पुस्तकामध्ये ती रोहित शर्माचं नावसुद्धा लिहिणार असल्याचं म्हटलं होतं. एका मुलाखतीमध्ये सोफियाने रोहित शर्मासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगितलं होतं आणि या नात्याशी संबंधित अनेक गोष्टीसुद्धा ती या पुस्तकामध्ये सांगणार होती. सोफिया एवढ्यावरच थांबली नव्हती. ती म्हणाली की, 'रोहित माझ्यासाठी वेडा होता आणि आमच्या दोघांचे खूप जवळचे नाते होते,आम्ही खूप वेळ एकत्र घालवला, पण एके दिवशी त्याने त्याच्या मित्रांमध्ये त्याची फॅन म्हणून ओळख करून दिली आणि माझं मन दुखावलं आणि मग आमच्यात दुरावा निर्माण होऊ लागला.' मात्र, सोफियाच्या या वक्तव्यावर रोहित शर्माने कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नव्हती. बोल्ड अभिनेत्री सोफियाने २०१६ मध्ये जाहीर केलं की ती सर्व काही सोडून नन बनली आहे. तिने तिचे सिलिकॉन स्तनही काढले. जेव्हा तिने नन बनण्याचा आपला इरादा जाहीर केला तेव्हा ती म्हणाली होती की ती एका रात्रीत नन बनली नाही. नात्यातील छळानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, नन बनल्यानंतरही सोफियाच्या फोटोंचा सोशल मीडियावर काहीही प्रभाव पडला नाही, ती सातत्याने धार्मिक फोटोंसह वादग्रस्त पोज देताना दिसली, त्यानंतर तिला खूप ट्रोल करण्यात आलं. नन बनल्यानंतर सोफियाच्या बोल्ड फोटो थांबत नव्हते. त्यानंतर २०१७ मध्ये तिने इंटिरियर डिझायनर व्लाड स्टेनेस्कूसोबत लग्न केलं. जो तिच्यापेक्षा १० वर्षांनी लहान होता. लग्नानंतर त्यांनी खूप बोल्ड फोटो शेअर केले आणि काही काळानंतर त्यांचं नाते तुटलं. सोफियाने पतीवर मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला होता. तिने पतीला शैतान आणि चोर देखील म्हटलं होतं.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/K5FViOw

No comments:

Post a Comment