Breaking

Thursday, January 30, 2025

पाकिस्तानला २४ तासांत बसू शकतो अजून एक मोठा धक्का, आयसीसी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत https://ift.tt/odnKJWL

नवी दिल्ली : चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत आता पाकिस्तानला २४ तासांत अजून एक धक्का बसणार असल्याचे म्हटले जात आहे. कारण आयसीसी आता चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत आता एक मोठा निर्णय घेणार आहे. त्यामुळे येत्या २४ तासांत पाकिस्तानला मोठा धक्का बसण्याच शक्यता वर्तवली जात आहे.चॅम्पियन्स करंडक वन-डे क्रिकेट स्पर्धेसाठी स्टेडियम पूर्ण होण्याची मुदत ३१ जानेवारी आहे. मात्र, ही स्टेडियम वेळेत पूर्ण होण्याची शक्यता धूसर असल्याची शेरेबाजी पाकिस्तानातील माध्यमांनीच केली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन मोहसीन नक्वी यांनी मात्र स्टेडियम वेळेत पूर्ण होतील, अशी ग्वाही दिली आहे. चॅम्पियन्स स्पर्धा १९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. पण त्यांना आयसीसीला आपली मैदानं ३१ जानेवारीलाच सोपवायची आहेत. त्यापूर्वी पाकिस्तानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण हे पीसीबीने त्यांचे मार्केटींग केले असून यामध्ये पूर्ण तथ्य नसल्याचे म्हटले जात आहे. जर ३१ जानेवारीपर्यंत जर मैदानं पूर्ण झाली नाहीत, तर पाकिस्तानतडून चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद काढून घेतले जाऊ शकते.स्टेडियमच्या नूतनीकरणाचे काम निश्चित मुदतीत पूर्ण होणे अशक्य आहे. या कामाची जबाबदारी सोपवलेले मात्र हे काम वेळेत पूर्ण होणार असल्याची ग्वाही देत आहेत. चॅम्पियन्स स्पर्धेसाठी या स्टेडियमचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेणारे पाकिस्तान बोर्ड एक तर हिरो होईल, नाहीतर झिरो, अशी शेरेबाजी पाकिस्तानातून प्रसिद्ध होणाऱ्या 'डॉन' या वर्तमानपत्राने केली आहे. पाक बोर्डाचे चेअरमन मोहसीन नक्वी यांनी मंगळवारी रावळपिंडी स्टेडियमची पाहणी केली आणि त्यानंतर चॅम्पियन्स करंडक स्पर्धा ठरल्यानुसारच होईल, ही ग्वाही दिली. मात्र, पाकमधील माध्यमांच्या मते लाहोर, कराची आणि रावळपिंडीतील स्टेडियमचा ताबा पाक बोर्डाकडे शुक्रवारपर्यंत मिळण्याची शक्यता कमी आहे. पाकिस्तानने चॅम्पियन्स स्पर्धेपूर्वी तिरंगी स्पर्धा घेतली आहे. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेचा सहभाग असलेही ही स्पर्धा ८ ते १४ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. त्यातील पहिल्या दोन लढती लाहोरला आहेत. त्यानंतरच्या तीन लढती (अंतिम फेरीसह) कराचीत होणार आहेत. स्टेडियम सामने होण्यासाठी तयार होतील. मात्र, चॅम्पियन्स स्पर्धेतील लढती होणारी स्टेडियम ही जागतिक दर्जाची असतील, अशी ग्वाही देण्यात आली होती. आता याची पूर्तता होणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे, असे पाक बोर्डाचा अधिकारी म्हणाला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/nUycEhD

No comments:

Post a Comment