Breaking

Thursday, January 30, 2025

युद्धनौका ड्रोनने सज्ज, समुद्रमार्गे अमली पदार्थ तस्करीवर मोठा अंकुश https://ift.tt/KFVlNti

समुद्रातून होणाऱ्या अमली पदार्थ तस्करीवर अंकुश मिळवण्यात भारतीय तटरक्षक दलाला यश आले आहे. सातत्यपूर्ण टेहळणीमुळे या तस्करांना पश्चिमेला २०० सागरी मैलाच्या हद्दीबाहेर लोटण्यात आल्याचे भारतीय तटरक्षक दलाचे पश्चिम क्षेत्र प्रमुख महानिरीक्षक भिषम शर्मा यांनी सांगितले. १ फेब्रुवारी या तटरक्षक दल स्थापना दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. किनारपट्टी सुरक्षेसह समुद्री पर्यावरण रक्षण, प्रदूषणापासून समुद्राचा बचाव व मानवी शोध आणि बचावकार्य, ही तटरक्षक दलाची प्राथमिक कर्तव्ये आहेत. मात्र २६/११ च्या हल्ल्यानंतर समुद्री सुरक्षा व समुद्री गस्तीचे कामदेखील तटरक्षक दलाकडे आले आहे. याअंतर्गतच तटरक्षक दलाने २०१७ पासून ५२ हजार कोटी रुपयांहून अधिक किंमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. त्यातील ३७ हजार कोटी रुपयांहून अधिक जप्ती ही २०२४ मधील आहे. मात्र ती एकाच घटनेत अंदमानजवळ झालेली होती.याबाबत भिषम शर्मा यांनी सांगितले की, 'वायव्य, उत्तर-मध्य आशिया ते म्यानमार, इंडोनेशिया किंवा आणखी दक्षिणेकडे अंमली पदार्थांची तस्करी वाढती आहे, हे निश्चित. मात्र तटरक्षक दलाने विशेषत: अरबी समुद्रात सततची गस्त व टेहळणी सक्षम केली आहे. त्यामुळेच मागील वर्षभरात अंमली पदार्थ तस्करांना भारतीय समुद्री क्षेत्रातून दूर अरबी समुद्राच्या आणखी पश्चिमेकडे भारताच्या २०० सागरी मैलापर्यंतच्या विशेष आर्थिक क्षेत्राबाहेर लोटण्यात यश आले आहे.'बांगलादेशी घुसखोरी ही चिंताजनक असल्याचे मतही भिषम शर्मा यांनी यावेळी मांडले. 'बांगलादेशी घुसखोरी ही संपूर्ण देशाची चिंता आहे. ती समुद्रीमार्गे देखील होऊ शकते. मात्र, आत्तापर्यंत किमान पश्चिम समुद्री क्षेत्रात तरी अशी कुठलीही घटना घडलेली नाही. तटरक्षक दलाचे त्यावर बारीक लक्ष आहे', असे त्यांनी सांगितले.युद्धनौका ड्रोनने सज्जआधुनिक गस्ती व टेहळणीसाठी तटरक्षक दलाने ड्रोन विमाने खरेदी केली आहेत. अशी वैमानिकविरहित विमाने (ड्रोन) समुद्री गस्तीवेळी युद्धनौकांकडे दिली जात आहेत. काही ड्रोन विमाने किनारपट्टीवरही तैनात आहेत. मात्र किनारपट्टीवरील ड्रोन टेहळणी आणि समुद्री गस्तीवरील युद्धनौकांवरील ड्रोन टेहळणी यांत फरक असल्याचे शर्मा यांनी स्पष्ट केले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/x8MpYrs

No comments:

Post a Comment