Breaking

Sunday, January 12, 2025

१४ फ्लॉपनंतर जिंकलेला नॅशनल अवॉर्ड, याच अभिनेत्याच्या आजोबांनी इंडियन आर्मीसाठी बनवलेली पहिली तोफ, ओळखलं का कोण? https://ift.tt/4OYxjBP

मुंबई- फोटोत दिसणारा हा अभिनेता कोण आहे हे तुम्ही ओळखलं का? या अभिनेत्याचे कुटुंब लष्करी पार्श्वभूमीचे आहे, परंतु त्याने फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्याचा निर्णय घेतला अन् चित्रपटांमध्ये नाव कमावले. या अभिनेत्याच्या आजोबांनी भारतीय सैन्यासाठी पहिली तोफ बनवली होती. या हिंटवरुन तुम्ही ओळखला का हा अभिनता कोण? विशेष म्हणजे या अभिनेत्याने चित्रपटांमध्ये प्रवेश केला तेव्हा त्याचा पहिला चित्रपट फ्लॉप ठरला. यानंतर त्याने सुमारे १४ चित्रपट केले, ते सुद्धा फ्लॉप ठरले. पण यानंतर त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या अभिनेत्याच्या पालकांचा तो लहान असतानाच घटस्फोट झाला होता. त्याची जबाबदारी त्याच्या आईकडे देण्यात आली होती, त्याची आई एक शिक्षिका होती. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी, अभिनेता एक उत्तम मॉडेल होता, त्याने मॉडेलिंगच्या जगात खूप नाव कमावले होते. ओळखलं का हा अभिनेता कोण आहे? पदार्पणाचा सिनेमा ठरला फ्लॉप हा अभिनेता आहे. २००१ मध्ये 'प्यार इश्क और मोहब्बत' या चित्रपटातून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. याआधी त्याने मॉडेलिंगच्या जगात खूप नाव कमावले होते. दिल्लीतील एका पार्टीत त्याला पाहिल्यानंतर डिझायनर रोहित बाल यांनी त्याला ही संधी दिली. यानंतर त्यांना 'प्यार इश्क और मोहब्बत' नावाचा पहिला चित्रपट मिळाला, पण तो फ्लॉप झाला. आर्थिक संकटाचा सामना करावा लागला, भाडे देण्यासाठीही पैसे नव्हते येथून अर्जुन रामपालचा कठीण प्रवास सुरू झाला. एक वेळ अशी आली अर्जुन घराचे भाडेही देऊ शकत नव्हता. पण घरमालक इतका चांगला होता की त्याच्याकडे जेव्हा पैसे असायचे तेव्हाच ते त्यांच्याकडून पैसे घ्यायचे. पण २००६ मध्ये 'डॉन' आल्यानंतर अर्जुन रामपालचे नशीब बदलू लागले. यामध्ये त्याच्यासोबत शाहरुख खान होता. हा चित्रपट हिट झाला आणि त्यानंतर पुढच्या वर्षी त्याला शाहरुखसोबत 'ओम शांती ओम' मध्ये खलनायकाची भूमिका मिळाली. हा देखील हिट झाला. 'डॉन' चित्रपटाने करिअर बदलले, 'रॉक ऑन'साठी मिळाला राष्ट्रीय पुरस्कार अर्जुन रामपालच्या कारकिर्दीतला महत्त्वाचा टप्पा २००८ मध्ये आला जेव्हा त्याला 'रॉक ऑन' मिळाला. यामध्ये त्यांची सहाय्यक भूमिका होती. त्यासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. काही वर्षांनी अर्जुन रामपालच्या कारकिर्दीला उतरती कळा मिळाली. त्याचे चित्रपट एकामागून एक फ्लॉप होऊ लागले. तोपर्यंत १४ चित्रपट फ्लॉप झाले 'डॉन' येण्यापूर्वी या अभिनेत्याचे १४ चित्रपट फ्लॉप झाले होते. पण अर्जुन रामपालने चित्रपटांमध्ये काम करणे सुरू ठेवले. तो २०२४ मध्ये 'क्रॅक' चित्रपटात दिसला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/gAPQDfB

No comments:

Post a Comment