Breaking

Monday, January 13, 2025

ज्ञानाच्या मंदिरातच विद्यार्थीनीसोबत गैरवर्तन, विकृत शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; संस्थाचालकांकडूनही मोठी कारवाई https://ift.tt/brV3l6Y

प्रसाद रानडे, रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या एका शाळेत शिक्षकाने विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन केल्याची संतापजनक घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला असून शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत. तर शैक्षणिक संस्थेकडून या विकृत कंत्राटी शिक्षकाचे तातडीने निलंबन करण्यात आले आहे. हा संतापजनक प्रकार विद्यार्थिनीने आपल्या पालकांना याबाबत सांगितले. यानंतर पालकांनी शिक्षकाला घेरले आणि त्याला जाब विचारला. तर त्याला चांगला चोप देखील दिला. या गंभीर घटनेची माहिती मिळताच संस्थेच्या पदाधिकारी शाळेत दाखल झाले. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ शिक्षकाचे निलंबन केले. नामांकित असलेल्या या संस्थेच्या शाळेत असा प्रकार आजवर कधीही घडला नव्हता त्यामुळे संस्थाचालकांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.कंत्राटी तत्वावर असलेल्या संशयित शिक्षकाने शिक्षकाने मुलीसोबत गैरकृत्य केल्याचे समजताच पालक चांगलेच संतापले आहेत. शाळेचा एक शिपायाने संतप्त होत पालकांनाच मारहाण केल्याचे देखील वृत्त आहे. संबंधित प्रकारामुळे शाळेच्या आवारात मोठी गर्दी जमली होती. या घटनेची माहिती मिळत आज काही वेळातच रत्नागिरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. रत्नागिरी पोलिसांनी संबंधित शिक्षकाला ताब्यात घेतले आहे. या संपूर्ण घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतली असून पुढील तपास सुरु आहे. तर पोलिसांच्या माहितीनुसार मंगळवारी संबंधित कंत्राटी शिक्षकाला न्यायालयात हजर केले जाणार आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/eDO0hHu

No comments:

Post a Comment