पाटणा : हुंड्याच्या लालसेपोटी कुटुंब माणुसकी विसरुन विवाहितेशी इतकं क्रूर कृत्य करु शकतं, याचा विचारही केला जाऊ शकत नाही अशी घटना बिहारमधून समोर आली आहे. कटिहार जिल्ह्यात एका विवाहित महिलेच्या मृतदेहाचे तुकडे कमालपूर रेल्वे ट्रॅकजवळ आढळून आले. मृतदेहाची अवस्था अशी होती की, कोणालाच ओळखता पटवता येत नव्हती. जिल्ह्यातील आझमनगर गावातून ही घटना उघडकीस आली आहे. कडवा बिशनपूर येथील चांदनी असे मृत महिलेचे नाव आहे.अधिक माहिती अशी की, चांदनीचा विवाह दोन वर्षांपूर्वी जळकी, आझमनगर येथील सुबोल शर्मा याच्याशी झाला होता. लग्न झाल्यापासून सासरच्या लोकांनी चांदनीकडे हुंड्यासाठी तगादा लावला होता. यासाठी तिचा अनेकप्रकारे छळ देखील केला. यामुळे चांदणीच्या मृत्यूप्रकरणी तिचे पती आणि सासरच्या मंडळींवर खुनाचा संशय आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आरोपीचा शोध घेत आहेत. चांदणी आणि सुबोलचा घरच्यांच्या संमतीने विवाह झाला परंतु लग्नानंतर सुबोल आणि त्याच्या कुटुंबीयांकडून हुंड्याची मागणी सुरू झाली. चांदनीला ते बेदम मारहाण करायचे. याप्रकरणी अनेकदा पंचायत देखील बोलावण्यात आली आणि तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला पण सारे फोल ठरले. सुबोलकडून होणारे अत्याचार काही कमी झाले नाहीत. १६ जानेवारीला सुबोल चांदनीला त्याची बहीण रुमा देवी हिच्या मंगतपूर येथील घरी सोडून आला. १८ जानेवारीला चांदनी बेपत्ता असल्याची माहिती चांदनीच्या कुटुंबीयांना मिळाली. चांदनीच्या कुटुंबीयांनी स्थानिक प्रमुख प्रतिनिधी मोहम्मद अरब यांच्या मदतीने तिचा शोधही सुरू केला होता. आणि १८ जानेवारीला अचानक रोजी सायंकाळी कमालपूर रेल्वे ट्रॅकवर एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला आणि खळबळ उडाली. पोलिसांना आधी मृतदेहाची ओळख पटू शकली नाही.२१ जानेवारी रोजी चांदनीच्या कुटुंबीयांना मृतदेहाचा फोटो दाखवण्यात आला. कुटुंबीयांनी मृतदेह चांदनी म्हणून ओळखला. चांदनीचे वडील चमरू शर्मा यांनी सांगितले की, हुंड्यासाठी त्यांच्या मुलीवर अत्याचार झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. तर त्यांचा जावई सुबोल शर्मा आणि त्यांच्या नातेवाईकांनी चांदनीचा छळ करुन तिची हत्या केल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्य प्रतिनिधी मोहम्मद अरब म्हणाले की, पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींना लवकरात लवकर अटक करावी. मृत चांदनीला न्याय मिळावा. सध्या सुबोल आणि त्याचे सर्व नातेवाईक गावातून फरार आहेत. आरोपींना पकडण्यासाठी पोलिस छापे टाकत आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/EGd3VkX
No comments:
Post a Comment