मुंबई- चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीमधून एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. , आणि यांना धमकीचा ईमेल आला आहे. प्राथमिक तपासात हे ईमेल पाकिस्तानमधून पाठवण्यात आल्याचे समोर आले आहे. ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीने धमकी दिली आहे की जर त्याला ८ तासांच्या आत या तीन कलाकारांकडून प्रतिसाद मिळाला नाही तर तो काहीतरी कारवाई नक्की करेल. कलाकारांनी ही बाब पोलिसांनासुद्धा सांगितली. या तक्रारीवरून पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे आणि प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजपाल यादव, रेमो डिसूझा आणि सुगंधा मिश्रा यांना एक ईमेल आला. तो धमकी देणारा इमेल आहे. सुगंधाच्या तक्रारीवरून पोलिसांनी एनसी आणि राजपाल यादवच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल केला आहे. रेमोकडूनही तक्रार दाखल करण्यात आली आहे. राजपाल यादव हा एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आहे. तो शेवटचा कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया ३' चित्रपटात दिसला होता. रेमो डिसूझा एक प्रसिद्ध कोरिओग्राफर आहे आणि सुगंधा मिश्रा एक विनोदी कलाकार आणि गाय़िका आहे. ती कपिल शर्माच्या शोमध्ये दिसली आहे.पाकिस्तानमधून ईमेल आला आहे. ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीने शेवटी 'बिष्णू' लिहिले असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. हा ईमेल पाकिस्तानमधून पाठवण्यात आल्याचा दावा केला जात आहे. या ईमेलमध्ये लिहिले आहे की, 'आम्ही तुमच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहोत. आम्हाला वाटते की एक संवेदनशील बाब तुमच्या लक्षात आणून देणे महत्त्वाचे आहे. हा पब्लिस्टंट नाही किंवा त्रास देण्याचा प्रयत्न नाही. ८ तासांत उत्तर मागितले आहे ईमेलमध्ये पुढे लिहिले आहे की, ' या मेसेजसोबत आम्ही तुम्हाला गंभीरता आणि गोपनियतेचा आग्रह करतो. असे नाही केले तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. याचा परिणाम तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावरही होईल. आम्हाला पुढील ८ तासांत तुमच्याकडून त्वरित प्रतिसादाची अपेक्षा आहे. जर आम्हाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, तर आम्ही असे गृहीत धरू की तुम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेत नाही आहात आणि आवश्यक ती कारवाई करू. विष्णू
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/KsTqbCO
No comments:
Post a Comment