दीपक पडकर, इंदापूर : बारामतीतील कोयता गँगचं लोण पुण्यातून इंदापूरपर्यंत आलं आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापुरातील भवानीनगर येथे मुलीच्या प्रेमसंबधातून धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधांतून दोन विद्यार्थ्य्यांवर कोयत्याने वार करण्यात आले. मात्र पोलिसांनी पाच विद्यार्थ्य्यांवर सिनेस्टाईल पद्धतीने गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अदनान महंमद शेख (वय १९, रा.सणसर), पियुष प्रथम चव्हाण (वय १९,रा. सणसर), यशराज गणेश अरवडे (वय १९, रा. सर्वजण, सणसर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या हल्ल्यात सुजल जाधव हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर बारामतीमधील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर संचित बाळासो घोळवे ही जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार ३१ जानेवारी रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास संचित घोळवे आणि सुजल जाधव आणि त्यांचे सहकारी मित्र भवानीनगर भवानीमातेच्या मंदिरामध्ये बसले होते. त्यावेळी अदनान शेख, पियुष चव्हाण, यशराज अरवडे आणि दोन अल्पवयीन मित्र अशा पाच जणांनी सुजल जाधव आणि संचित घोळवे यांना लाथांनी मारहाण केली. तसंच नाही तर संचित घोळवे, सुजल जाधव यांच्यावर कोयत्याने वार केले. याची माहिती वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे आणि पोलीस उपनिरीक्षक विजय टेळकीकर यांनी तातडीने मुलांना ताब्यात घेऊन कारवाई केली.प्रेमसंबधातून कोयत्याने वार
हा कोयता हल्ला मुलीच्या प्रेमसंबधातून झाला असल्याची माहिती आहे. काल गुरुवारी प्रेमसंधातून वाद झाला होता. मात्र तो विद्यार्थ्यांनी आपापसात मिटवला असल्याचं पोलिसांनी सांगितलं. आरोपींना सिनेस्टाईल पाठलाग करुन पकडले असून कोयत्याच्या हल्लानंतर आरोपी पुणेच्या दिशेने पळून निघाले होते. वालचंदनगर पोलिसांनी तातडीने वेगवेगळी दोन पथकं तयार करुन पुणेच्या दिशेने रवाना केली. आरोपींना सिनेस्टाईल पाठलाग करुन सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने शिफातीने अटक केली.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/ubomp63
No comments:
Post a Comment