Breaking

Thursday, January 9, 2025

दुचाकीवर रॉडने मारहाण, भररस्त्यात सव्वा कोटींची रक्कम लुटली; हल्ल्यात कर्मचारी गंभीर जखमी https://ift.tt/bwqNRD9

पंकज गाडेकर, वाशिम : खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीत काम करणाऱ्या दोन कामगारांवर चोरट्यांकडून हल्ला करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांकडून १ कोटी २० लाख रुपयांची रक्कम जबर मारहाण करून लुटली असल्याची घटना वाशिम जिल्ह्यात घडली आहे. वाशिम शहरातून जाणाऱ्या अकोला नांदेड महामार्गावरील हिंगोली नाक्या समोरील उड्डाण पुलावर गुरुवारी ५ वाजून ४० मिनिटांच्या दरम्यान घडली आहे.

दुचाकीवर असताना दोघांना रॉडने मारहाण

वाशिम शहरातील खाजगी व्यापाऱ्याकडे काम करणारे २ कर्मचारी बँकेतून रक्कम काढून दुचाकीवरून बाजार समितीत निघाले होते. त्यावेळी काही अज्ञात चोरट्यांनी मागून दुचाकीवरुन येऊन दोघांना रॉडने मारहाण केली. मारहाण करत त्यांच्याकडील १ कोटी २० लाख रुपयांची रोकड लुटल्याच्या धक्कादायक प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही रक्कम विठ्ठल सोयाबीन मार्केटमधील एका व्यापाऱ्याची असल्याचं समोर आलं आहे.

नेमकं काय घडलं?

वाशीम शहरालगत अकोला नांदेड महामार्गावर बाहेती यांची खाजगी कृषी बाजार समिती असून तेथे शेतकऱ्यांचा माल खरेदी केला जातो. याठिकाणी लाखो रुपयांची उलाढाल होत असते. खरेदी केलेल्या शेती मालाचे पैसे देण्यासाठी बँकेतून बाहेती यांचे कर्मचारी ज्ञानेश्वर बयस आणि विठ्ठल हजारे हे नेहमी प्रमाणे बाहेती मार्केटकडे निघालेले. त्यावेळी रस्त्यावर अज्ञात चोरट्यांनी रॉडने मारून कामगार विठ्ठल हजारे आणि ज्ञानेश्वर बयस या दोघांना गाडीवरून खाली पाडलं आणि त्यांना जबर मारहाण करून त्यांच्या जवळ असलेली पैशांची बॅग हिसकावून घेत घटनास्थळावरून पोबारा केला.या घटनेत दोन्ही कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपासाला सुरुवात केली आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी नाकाबंदी लावून वाहनांची कसून तपासणी सुरू आहे. पोलिसांनी या लुटीचा तपास करताना चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथकं तयार केली आहेत. या प्रकरणाची परिसरात चर्चा असून भीती व्यक्त केली जात आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/39bORgn

No comments:

Post a Comment