Breaking

Wednesday, January 8, 2025

सिनेसृष्टीवर शोककळा! सुप्रसिद्ध निर्माते प्रीतीश नंदी यांचं निधन, वयाच्या ७३ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप https://ift.tt/dcGbZ3y

मुंबई - सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते, लेखक कवी प्रीतीश नंदी यांचं निधन झालं असून त्यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने चित्रपटसृष्टीलाच नव्हे तर कला आणि साहित्य जगतालाही मोठा धक्का बसलाय. त्यांनी 'चमेली' आणि 'प्यार के साइड इफेक्ट्स' यांसारखे सिनेमे केले होते. प्रीतीश नंदी यांच्यासाठी त्यांचे जवळचे मित्र अनुपम खेर यांनी खास पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अनुपम खेर यांनी प्रितीश यांचे फोटो शेअर करत लिहिलं की, 'माझा सर्वात प्रिय आणि जवळच्या मित्रांपैकी एक प्रीतीश नंदी यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले आणि धक्का बसला. कवी, लेखक, चित्रपट निर्माता आणि एक धाडसी आणि जबरदस्त पत्रकार. मुंबईतील माझ्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये तो माझा मोठा सपोर्ट सिस्टम होता. तो माझी शक्ती होता. अनेक गोष्टी आम्ही आपापसात शेअर केल्या. मला भेटलेल्या सर्वात निडर लोकांपैकी तो एक होता. त्याच्याकडून मला खूप काही शिकायला मिळालं. गेल्या काही दिवसांपासून आमची फारशी भेट होत नव्हती. पण एक काळ असा होता की आम्हाला कोणी वेगळं करू शकत नव्हतं.' अनुपम खेर यांनी पुन्हा लिहिलं की, 'फिल्मफेअरला त्याने मला इंट्रोड्यूस करून मला आश्चर्यचकित केलं ते मी कधीही विसरणार नाही. तो मित्रांचा मित्र होता. मला नेहमी तुझी आठवण येईल मित्रा. आम्ही एकत्र घालवलेला वेळही मला आठवेल. तुमच्या आत्म्याला शांती लाभो. माझं हृदय तुटलं आहे'

प्रीतीश नंदी यांनी २४ चित्रपट केले

१५ जानेवारी १९५१ रोजी जन्मलेल्या प्रीतीश नंदी यांनी दूरदर्शन, झी टीव्ही आणि सोनी टीव्हीवर ५०० बातम्या आणि चालू घडामोडींचे शो केले. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी २४ चित्रपट केले. ज्यात 'चमेली' आणि 'प्यार के साइड इफेक्ट्स' व्यतिरिक्त त्यांनी 'सूर', 'कांटे', 'हजारों ख्वैशीं ऐसी', 'एक खिलाडी एक हसीना' आणि 'एक खिलाडी एक हसीना' या चित्रपटांची निर्मिती केली.

प्रीतीश नंदींच्या या मालिकेला एमी नॉमिनेशन मिळालं

प्रीतीश नंदींच्या निर्मिती कंपनीने 'फोर मोअर शॉट्स प्लीज!' या वेब सीरिजची निर्मिती केली होती. या वेब सीरिजला २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय एमी नामांकन मिळालं. प्रीतीश नंदी हे खासदारही होते. ते सहा वर्षे संसद सदस्य होते.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Y6yngwE

No comments:

Post a Comment