राजकोट : भारताला तिसऱ्या टी २० सामन्यात पराभव पत्करावा लागला. यापूर्वी भारताने दोन सामने जिंकले होते खरे, पण या सामन्यात भारताला विजयाची हॅट्रीक काही साजरी करता आली नाही. भारताचा हा पराभव कोणत्या एका खेळाडूमुळे झाला, हे भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने सामना संपल्यावर सांगितले आहे.
२४ चेंडूंत ५५ धावांची गरज होती अन्...
सूर्यकुमार यादवने सामन्यानंतर सांगितले की, " मैदानात बरेच दव पडलेले होते. त्यामुळे आम्ही टॉस जिंकल्यावर प्रथम गोलंदाजी करण्यचा निर्णय घेतला, कारण धावांचा पाठलाग आम्ही करू शकू. हार्दिक पंड्या आणि ही महत्वाची जोडी जेव्हा मैदानात होती, तेव्हा आम्हाला विजयासाठी २४ चेंडूंत ५५ धावांची गरज होती. चार षटकात ५५ धावा होऊ शकतात, असे आम्हाला वाटत होते. यावेळी सामना आम्ही जिंकू असा आम्हाला विश्वास वाटत होता, पण तसे घडले मात्र नाही. "भारताच्या पराभवाचा कोण ठरला व्हिलन...
सूर्या पुढे म्हणाला की, " अखेरच्या चार षटकांमध्येही आमच्या हातात सामना होता, असे मला वाटते. पण दोन्ही संघांतील फरक ठरला फक्त एकच खेळाडू आणि तो खेळाडू म्हणजे आदिल रशिद. या सामन्यात आदिल रशिदला इंग्लंडच्या या विजयाचे श्रेय द्यायला हवे. तो एक ग्रेट खेळाडू आहे, पण त्याच्या गोलंदाजीवर कसे खेळायचे याचाही एक प्लॅन होता. रशिदच्या गोलंदाजीवर स्ट्राइक सतत बदलत राहायची, असे आम्ही ठरवले होते. पण आदिल रशिदने अशी गोलंदाजी केली ती, त्याने आम्हाला धावा करण्याची जास्त संधीच दिली नाही. आम्ही स्ट्राइक बदलू शकलो नाही आणि तिथेच आमचा पराभव झाला, असे मला वाटते ."पराभवातून आम्ही काय शिकलो...
सूर्या म्हणाला की, " प्रत्येक टी २० सामन्यातून आम्ही काही ना काही शिकत असतो. या सामन्यात इंग्लंडची आम्ही ८ बाद १२७ अशी अवस्था केली होती. पण त्यानंतरही त्यांनी १७० धावांचा पल्ला गाठला. मोहम्मद शमीने या सामन्यात कमबॅक केले, त्याला गोलंदाजी करताना चांगले वाटले. वरुण चक्रवर्ती हा अथक मेहनत घेणारा खेळाडू आहे आणि त्यामुळे त्याला यश मिळताना दिसत आहे. " भारताला तिसऱ्या टी २० सामन्यात इंग्लंडकडून २६ धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आता चौथ्या सामन्यात भारत विजय मिळवणार की इंग्लंड मालिकेत बरोबरी साधणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असणार आहे.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/AM5NCrE
No comments:
Post a Comment