Breaking

Wednesday, January 22, 2025

साहेब चिडलेत ताबडतोब घरी या... रात्री ११:३० वाजता मीनाताईंचा दादा कोंडकेंना फोन, काय घडलेलं? https://ift.tt/Q9K1vsm

मुंबई- हिंदुत्वासाठी कायम लढा देणारे, मराठी माणसांच्या हक्कासाठी कायम पेटून उठणारे हिंदू हृदय सम्राट यांची आज जयंती आहे. आज जरी ते हयात नसले तरी त्यांनी दिलेल्या शिकवणी आणि संस्कारांचा वारसा पुढे नेणारे अनेक सच्चे शिवसैनिक आहेत. केवळ राजकारणापुरतं मर्यादित न राहता बाळासाहेबांनी वेगवेगळ्या क्षेत्रांत आपली छाप पाडली होती. अनेकांना सढळ हस्ते मदत केलेली. सरळ हाताने काम होत नसेल तर समोरच्याच्या वाकड्यात शिरुन ते काम करुवून घ्यायचे. अशीच मदत त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या अनेक लोकांना केली होती. आणि बाळासाहेबांची अगदी घट्ट मैत्री होती. दादा गेल्यावर सुद्दा बाळासाहेब त्यांच्या अंत्यदर्शनाला उदास मनाने एकटेच पोहचले होते. दादा कोंडके आणि बाळासाहेबांचे किस्से खूप प्रसिद्ध आहे. त्यांच्या मैत्रीची सुरुवातच मुळात मराठी सिनेमांमुळे झालेली. सोंगाड्या या सिनेमामुळे दादा कोंडके सुपरहिट झालेले. मात्र जेव्हा हा सिनेमा प्रदर्शित करण्याची वेळ आलेली तेव्हा त्यासाठी थिएटरच मिळत नव्हते. पुण्याला हा सिनेमा २५ आठवड्या चालला पण मुंबईत तो रिलीज झालाच नव्हता. त्याकाळी मुंबईचे कोहिनूर हे थिएटर फार प्रसिद्ध होते परंतु तिथे मराठी सिनेमा लागत नसत. त्या थिएटरचा मालक नॉन महाराष्ट्रीयन होता. कपूर असे त्याचे नाव होते. दादांनी त्याला ४० हजार रुपये देऊन सोंगाड्या सिनेमा थिएटर मध्ये लावण्यात सांगितले. दोन आठवडे सोंगाड्या कोहिनूर मध्ये लागल्यानंतर देव आनंदी यांचा तेरे मेरे सपने रिलीज झाला. त्यामुळे कपूर यांनी कोहिनूर मधून सोंगाड्या सिनेमा उतरवून त्याजागी देव आनंद यांचा सिनेमा लावला.‌ दादा आणि थिएटर मालक कपूर यांच्यामध्ये खूप बाचाबाची झाली. त्यानंतर दादांनी बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली आणि संपूर्ण प्रकार सांगितला. बाळासाहेबांनी दादांचे विच्छा माझी पुरी करा या नाटकाचे काही प्रयोग पाहिलेले त्यामुळे त्यांना दादांचं नाव ओळखीचं होतं. बाळासाहेबांनी तेव्हा कपूर यांना फोन केला तेव्हा तो समोरून उद्धटासारखा त्यांना म्हणाला- कोण बालासाहेब, मैने ही जानता और देखो मै मालिक हू जो करना है वो कर लो... यावर बाळासाहेब जशास तसे उत्तर देत म्हणाले की अगर हम कुछ करेंगे तो बहुत भारी पडेगा. त्याच रात्री बाळासाहेबांनी आपल्या काही शिवसैनिकांसह कोहिनूर थिएटर गाठलं. ते जेव्हा गेले तिथे कपूर नव्हता त्यामुळे त्यांनी त्याला उचलून आणायची ऑर्डर दिली. कपूर आला तेव्हा साहेब म्हणाले -देखो कपुर, आज के बाद पिक्चर जितनी चलेगी आप थेटर मे नही आयेंगे. त्यानंतर दादा कोंडके यांचा सोंगाड्या कोहिनूर थिएटर मध्ये तब्बल ३७ आठवडे चालला. कोहिनूर थिएटरचा मालक कपूर पुढे बाळासाहेबांना एवढा घाबरला की तो समोरूनच दादा कोंडके यांना फोन करून विचारायचा की आपकी कोई फिल्म आने वाली है क्या? ... या घटनेनंतर दादा कोंडके यांच्या मनात बाळासाहेबांबद्दल अपार प्रेम निर्माण झालेलं. पुढे त्यांची इतकी जिव्हाळ्याची मैत्री होत गेली की जेव्हा बाळासाहेब नाराज असायची तेव्हा स्वतः मीनाताई दादांना फोन करायचा आणि म्हणायच्या- बाळासाहेब प्रचंड चिडले आहेत, तुम्ही ताबडतोब घरी या. दादा आले की ते बाळासाहेबांच्या खोलीत जायचे आणि त्यांच्याशी मनमुराद गप्पा मारायचे. बाळासाहेबांना आपला कोणताही सिनेमा दाखवल्याशिवाय दादांनी तो सेंन्सॉर कडे पाठवला नाही. चित्रपट पाहून बाळासाहेब स्वतः कोणत्या सिमला कट मिळेल हे अगदी अचूक सांगायचे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/7fKPBdA

No comments:

Post a Comment