Breaking

Wednesday, January 29, 2025

लग्नही झालं नव्हतं तरीही निर्मिती सावंत लावायच्या सासरकडचं नाव! माहेरची ओळख का लपवलेली? https://ift.tt/wNZy2MY

मुंबई- मनोरंजन सृष्टी म्हटली कलाकारांचा वागणं बोलणं, देहबोली या ठरलेल्या असतात. पण या सर्वांना छेद करून स्वतःला अभिनेत्री यांनी सिद्ध केले. तडपातळ बांधा असलेल्या अभिनेत्रीच पडद्यावर प्रेक्षकांचा विश्वास आणि मन जिंकून घेऊ शकतात या एक प्रकारच्या संकल्पनेला त्यांनी छेद केला. आज निर्मिती सावंत त्यांचा ६७ वा वाढदिवस साजरा करत आहे. निर्मिती सावंत यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या मालिका, नाटक आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांची मन जिंकून घेतली. त्यांच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. त्या प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्री बनल्या आहेत. निर्मिती सावंत बद्दल एक किस्सा फार रंजक आहे. तो म्हणजे त्यांनी लग्न आधीच त्यांच्या सासरकडचं नाव लावायला सुरुवात केली होती. त्याचं कारणही खास होतं. निर्मिती सावंत यांच्या माहेरचे नाव मधुमती देसाई होते. त्यांची आई कामगार कल्याण मध्ये नोकरी करत होत्या. तिथे त्या महिलांसाठी नाटक बसवायच्या. त्यावेळी त्यासोबत आपल्या लेकीला म्हणजेच मधुमतीलाही घेऊन जात. त्यामुळे मधुमतीला सुद्धा अभिनयाची आवड लागलेली. त्या पण वेगवेगळ्या नाटकात काम करायला लागलेल्या पण त्यांच्या वडिलांचा मात्र या क्षेत्राला कडकडून विरोध होता. एवढे अजूनही त्यांनी आपली आवड जोपासली. वेगवेगळ्या एकांकिका नाटकात त्यांनी काम केले आणि त्यात पारितोषिकही मिळवले. त्याकाळी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून वेगवेगळ्या वृत्तपत्रात त्यांची नाव छापून येत होती. नाटकात काम करत असताना मधुमती देसाईची ओळख महेश सावंत यांच्याशी झाली. ते त्यावेळी दिग्दर्शक म्हणून काम करत होते. त्यांच्यातली घट्ट मैत्री प्रेमात रूपांतर घेऊ लागले आणि मग त्यांनी लग्न करण्याचे ठरवले. महेश सावंत यांना मधुमती देसाईच्या घरची परिस्थिती ठाऊक होती. त्यांच्या वडिलांचा असलेला अभिनयाला विरोध ते जाणून होते म्हणूनच स्वतः महेश यांनी मधुमतीला एक सल्ला दिला. लग्नानंतर ठेवायचं नाव त्यांनी आधीच तिला सांगितलं. निर्मिती हे तुझं लग्नानंतरचा नाव असेल त्यामुळे तू आत्ताच हे स्वतःपुढे लाव. मधुमती यांना सुद्धा ही कल्पना पटली त्यामुळे नाटकात काम करताना मधुमती देसाई आपले नाव निर्मिती सावंत लावू लागल्या. त्यामुळे नाटकात त्यांचं नाव निर्मिती सावंत हेच घोषित होऊ लागले. अभिनेत्री निर्मिती सावंत यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास त्यांची कुमारी गंगुबाई नॉन मॅट्रीक ही मालिका खूप गाजली. याच मालिकेचा पुढे सिनेमा सुद्धा झाला. त्यानंतर त्यांनी श्यामची मम्मी, जाऊ बाई जोरात, व्हॅक्युम क्लिनर, संजय छाया, आजीबाई जोरात यांसारख्या अनेक मराठी नाटकांत काम केले. याशिवाय त्यांचे खबरदार, नऊ महिने नऊ दिवस, शुभमंगल सावधान, आयडियाची कल्पना, निशाणी डावा अंगठा, आम्ही सातपुते, झिम्मा आणि झिम्मा२ यांसारखे सिनेमे सुपरहिट झाले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/KI2VZgE

No comments:

Post a Comment