Breaking

Tuesday, January 28, 2025

हात फ्रॅक्चर, तोंडावर जखमा... अर्चना पूरण सिंहचा मोठा अपघात, आईची अवस्था पाहून मुलांना रडू अनावर https://ift.tt/r47a8sy

मुंबई- अर्चना पूरण सिंहने तिच्या यूट्यूब चॅनलवर एक नवीन व्लॉग शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने तिला झालेली दुखापत दाखवली आहे. राजकुमार रावसोबत एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान, अर्चना घसरली आणि तिचा मनगटाचे हाड मोडले. पडल्यामुळे तिच्या चेहऱ्यालाही दुखापत झाली आहे. या अपघातानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले. उपचारानंतर ती बरी झाल्यावर आणि कामावर परतली. तिने आता एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि तिची प्रकृती कशी आहे ते सांगितले आहे. तिने राजकुमारला फोन करून शूटिंगला उशीर होत असल्यामुळे माफी सुद्धा मागितली. व्लॉगची सुरुवात अर्चना पूरण सिंगने तिला झालेल्या दुखापतीच्या फुटेजपासून सुरुवात केली. ती कॅमेऱ्यापासून दूर असताना, सेटवरील एका व्हिडिओमध्ये ती पडताना आणि लागल्यामुळे ओरडताना दिसून आली. लगेचच, क्रू मेंबर्स जमले आणि तिला रुग्णालयात घेऊन गेले. तिचे पती परमीत सेठी यांना लगेच कळवण्यात आले. तिच्या मुलांनीही बातमीवर प्रतिक्रिया देताना एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि त्यातला एक जण रडू लागला. अर्चना पूरण सिंह जखमी अर्चनाने सांगितले की, पहिल्या दिवशी मानसिक धक्का बसल्यामुळे तिला व्हिडिओ बनवू दिला नाही. पण नंतर तिने रेकॉर्डिंगला परवानगी घेतली. अर्चनाचा नवरा म्हणाला, 'ती खूप बडबड करत आहे, याचा अर्थ ती आता ठीक आहे.' अर्चनाने तिच्या रुग्णालयाच्या खोलीबाहेरचे मुंबईचे दृश्य दाखवले. ती म्हणाली की तिला इथे राहता आले याचा तिला खूप आनंद आहे. पण तिला तिचे कामही अधुरे ठेवता येणार नाहीये. नवऱ्याने विनोद सांगितले ती हॉस्पिटलमधून निघण्याच्या तयारीत असताना, परमीतने तिला काही विनोद सांगितले. अर्चना घरी परतली आणि म्हणाली, 'तुम्ही कदाचित असे गृहीत धराल की मी ठीक आहे, पण माझे नुकतेच एक मोठे ऑपरेशन झाले आहे.' अर्चनाच्या हातात अजूनही वेदना अभिनत्री आता घरी असून अजुनही तिच्या हाताला वेदना जाणवत आहेत. अर्चनाने व्लॉग संपवताना म्हटले की प्रत्येक गोष्ट एका कारणासाठी घडते आणि नंतर ती लगेच कामावर परत येईल.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/fTDu0Gn

No comments:

Post a Comment