Breaking

Wednesday, January 29, 2025

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतासाठी आली गुड न्यूज, मोहम्मद शमीनंतर अजून एक खेळाडू ठरला फिट https://ift.tt/UBqbQ1E

नवी दिल्ली : चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होण्यापूर्वी आता भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. कारण मोहम्मद शमीनंतर आता भारताचा अजून एक खेळाडू फिट ठरल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता हा मॅचविनर खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

तीन खेळाडूंची फिटनेस नसताही संघात केली होती एंट्री...

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा ही फेब्रुवारीमध्ये सुरु होणार आहे. पण त्यापूर्वी भारताला त्यांचा संघ जाहीर करायचा होता. त्यावेळी भारतीय संघात अशा तीन खेळाडूंची निवड केली होती, जे फिट नव्हते. पण बीसीसीआयला विश्वास होता की, ते फिट होऊ शकतील.

बीसीसीआयने कोणती ठेवली होती महत्वाची अट...

बीसीसीआने या तिन्ही खेळाडूंपुढे एक महत्वाची अट ठेवली होती. ही अट म्हणजे भारताचा संघ जेव्हा चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी दुबईसाठी रवाना होईल, त्यापूर्वी या खेळाडूंना आपला फॉर्म आणि फिटनेस सिद्ध करावा लागेल. यामधील मोहम्मद शमीने आपला फिटनेस यापूर्वीच सिद्ध केला होता. आता भारतीय संघाकडून खेळताना त्याने आपला फॉर्मही दाखवला आहे.

भारताचा कोणता मॅचविनर खेळाडू ठरला फिट

भारताच्या दोन खेळाडूंची चिंता अजूनही भारतीय चाहत्यांना होती. हे दोन खेळाडू होते ते जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव. या दोघांनाही दुखापत झाली होती. त्यामुळे हे दोन्ही खेळाडू फिटनेस सिद्ध करू शकले नव्हते. पण आता दोघांपैकी एकाने आपला फिटनेस सिद्ध केला आहे आणि तो खेळाडू आहे कुलदीप यादव. कुलदीपला आता राष्ट्रीय अकादमीने फिटनेसबाबत हिरवा कंदील दिला आहे, कारण त्याने फिटनेस टेस्ट पास केली आहे. त्यानंतर आता कुलदीप यादव बीसीसीआयच्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळून आपला फॉर्मही दाखवणार असल्याचे आता समोर येत आहे.चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी आता भारताचे तीनपैकी दोन खेळाडू फिट ठरले आहेत. पण आता चाहत्यांना उत्सुकता असेल ती म्हणजे जसप्रीत बुमराह कधी फिट ठरणार आहे. कारण जसप्रीत बुमराह हा जगातील अव्वल गोलंदाज आहे, जो एकहाती सामना फिरवू शकतो. त्यामुळे त्याच्या फिटनेसच्या बातम्यांवर आता सर्वांचे लक्ष लागलेले असणार आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Ds4mh3Q

No comments:

Post a Comment