
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्रींच्या सौदर्याचे जग नेहमीच कौतकु करत असते. आता जरी मेकअप, वेगवेगळ्या सर्जरी यांचा सौंदर्यावर भडिमार होत असला तरी एककाळ असा होता जेव्हा कलाकारांचे नैसर्गिक सौंदर्य पडद्यावप पाहायला मिळायचे. असेच एक सौंदर्य म्हणजे . आज मधुबालाचा जन्मदिवस आहे. त्या हयात नसली तरी त्यांच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे अजूनही कौतुक होते. पण त्यांचा अंत हा फारच वाईट झाला होता. हिंदी चित्रपटसृष्टीतील सुंदर अभिनेत्री मधुबाला नेहमीप्रमाणे त्या सकाळी उठल्या आणि दात घासायला गेल्या. पण त्यांना त्यांच्या तोंडात रक्त दिसले. मधुबाला यांना वाटले की कदाचित ते एखाद्या दातातून किंवा हिरडीतून बाहेर आले असेल. पण नंतर त्यांना जाणवले की ही काहीतरी वेगळीच समस्या आहे. जेव्हा दिलीप कुमार यांना हे कळले तेव्हा त्यांनी अभिनेत्रीला डॉक्टरांकडे तपासणीसाठी पाठवले. तेव्हा त्यांना समजले की त्यांच्या हृदयात छिद्र आहे. मधुबालाच्या वडिलांना दिलीप आणि मधुबाला यांनी लग्न करावे असे वाटत नव्हते. त्यांच्या या हट्टीपणाने अभिनेत्रीचा सगळा आनंद हिरावून घेतला. मधुबाला यांना त्यांच्या वडिलांच्या विरोधात जायचे नव्हते. पण त्या जीवंतपणी मरण यातना सहन करत राहिल्या. मधुबाला यांनी भूतकाळ विसरण्यासाठी किशोर कुमार यांच्याशी लग्न केले. किशोर कुमार आधीच विवाहित असल्याने, त्यांनी अभिनेत्रीशी लग्न करण्यासाठी आपला धर्म बदलला. असे म्हटले जाते की मधुबाला या लग्नात खूश नव्हत्या. त्यांची बहीण मधुर भूषण यांनी सांगितले की, किशोर कुमार खूप प्रवास करायचे. ते त्यांच्या रेकॉर्डिंगमध्ये व्यस्त असायचे. डॉक्टरांनी मधुबालाला सांगितले की त्या दोन वर्षांपेक्षा जास्त जगू शकणार नाही. हे समजल्यावर त्या एकट्या रडत बसायच्या. किशोर कुमार यांनी एकदा म्हटले होते की, मधुबाला जेव्हा जेव्हा त्यांना पाहायच्या तेव्हा त्या रडायला लागायची. रडणे त्यांच्या आरोग्यासाठी आणि हृदयासाठी चांगले नव्हते. म्हणूनच ते मधुबालाला हसवण्याचा प्रयत्न करायचे. मधुबाला यांची तब्येत दिवसेंदिवस इतकी खालावत गेली की त्यांचा फक्त सांगाडा उरला. मधुबाला आरशात आपला चेहरा पाहून रडायच्या. काय होते मी काय झाले मी असं त्या सतत म्हणायच्या. दिलीप कुमार मधुबालाला भेटण्यासाठी रुग्णालयात गेले. जिथे अभिनेत्रीने त्यांना सांगितले की जेव्हा त्या बऱ्या होतील तेव्हा त्यांच्यासोबत काम करतील. दिलीप कुमार हो म्हणाले. नंतर दिलीप कुमार यांनी सायरा बानूशी लग्न केले आणि नंतर मधुबाला आणि ते दोघे पुन्हा कधीही भेटले नाहीत. आता मधुबाला यांचे धाडस खचले होते. काही वर्षांनी मधुबालांनी जगाचा निरोप घेतला. किशोर कुमार यांनी १९७६ मध्ये अभिनेत्री योगिता बालीशी तिसरे लग्न केले पण हे लग्नही फार काळ टिकले नाही आणि दोन वर्षांतच संपुष्टात आले.
from Marathi News: मराठी बातम्या, Delhi Election 2025-26, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/24mcfyK
No comments:
Post a Comment