
मुंबई- टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतून अनेक अभिनेत्री आल्या आणि गेल्या. काही अभिनेत्रींना त्यांच्या लग्नामुळे काम मिळू शकले नाही, तर काहींना मुले आणि कुटुंबामुळे काम करता आले नाही. खूप कमी अभिनेत्री आहेत ज्या त्यांचे स्टारडम टिकवून ठेवू शकल्या. अशीच एक अभिनेत्री म्हणजे रश्मी देसाई. एक काळ असा होता जेव्हा रश्मी टीव्हीवर राज्य करत होती. 'उत्तरन' या मालिकेने तिला स्टार बनवले. पण तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तिच्या व्यावसायिक आयुष्यावर खूप वाईट परिणाम झाला. लग्नाच्या ४ वर्षांनी तिचा घटस्फोट झाला. नंतर, ज्याच्या ती प्रेमात पडली तो विवाहित असल्याचे समोर आले. पण अभिनेत्रीने हिंमत गमावली नाही. आजही ती इंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण करत आहे. तसेच नवीन जोडीदाराच्या शोधात आहे. आज तिचा ३९ वा वाढदिवस साजरा करतेय. रश्मी देसाईने काही दिवसांपूर्वीच ब्रुट इंडियाला मुलाखत दिली होती. त्यात तिने सांगितले की, जेव्हा तिचा शो बंद झाला तेव्हा तिच्यावर ३.५ कोटी रुपयांचे कर्ज होते. ती ४ दिवस रस्त्यावर राहिली आणि तिच्या ऑडीमध्ये झोपली. मी माझे सामान माझ्या मॅनेजरच्या घरी ठेवले. कुटुंबापासून दूर होते. तिने असेही सांगितले की ती रिक्षावाल्यांसोबत २० रुपयांच्या थाळीत ती जेवायची. हे चार दिवस तिच्यासाठी अडचणींनी भरलेले होते. रश्मी देसाई म्हणाली होती, "माझा घटस्फोट झाला, मग माझ्या मित्रांना वाटले की मी खूप खडूस आहे कारण मी जास्त बोलत नव्हते, मग माझ्या कुटुंबालाही वाटले की माझे सर्व निर्णय चुकीचे आहेत." आता आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत रश्मी म्हणाली, “माझे पालक माझ्या आयुष्याच्या जोडीदाराबद्दल जाणून घेण्याचा खूप प्रयत्न करत आहेत. मला विश्वास आहे की योग्य वेळी योग्य व्यक्ती माझ्या आयुष्यात येईल.” रश्मी देसाईचे लग्न नंदीश संधूशी झाले होते. रश्मी देसाई टीव्ही ते ओटीटी पर्यंतच्या तिच्या प्रवासाबद्दल म्हणाली की, “माझा प्रवास एक कहाणी आहे. कारण माझी स्वप्ने मोठी आहेत. टीव्हीवरही मी विविध भूमिकांचा शोध घेतला. माझ्या अभिनयात विविधता आणण्यासाठी त्यावर काम केले. रश्मीने २०१४ मध्ये तिचा 'उत्तरन' मालिकेतला सह-अभिनेता नंदीश संधूशी लग्न केले. २०१६ मध्येच दोघांचा घटस्फोट झाला. २०१८ मध्ये तिची भेट आरव खानशी झाली. २०१९ मध्ये, दोघांनीही बिग बॉस १३ मध्ये भाग घेतला होता, जिथे सलमान खानने खुलासा केला की अरहान विवाहित आहे आणि त्याला एक मूल देखील आहे. अरहानने रश्मीपासून त्याच्या लग्नाची माहिती गुप्त ठेवली होती. तेव्हा रश्मीने त्याच्याशी असलेले नाते तोडले. रश्मी मात्र अविवाहित आहे आणि आता नवीन जोडीदाराच्या शोधात आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Delhi Election 2025-26, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/OFVnrPJ
No comments:
Post a Comment