Breaking

Monday, February 10, 2025

दक्षिण आफ्रिकेचा रेकॉर्ड मोडत आयर्लंडने कशी साकारली विजयाची हॅट्रीक, ऐतिहासिक विजय मिळवला https://ift.tt/3CntiwF

विनायक राणे : आयर्लंड क्रिकेट संघ सोमवारी सकाळी क्वीन्स स्पोर्ट्स क्लबवर दाखल झाला तेव्हा त्यांना यजमान झिम्बाब्वेवरील कसोटीविजयाची खात्री होती खरी; पण पावसामुळे हा विजय दूरावू नये, अशी प्रार्थनाही ते मनोमन करत होते. अखेर १८.३ षटकांत उर्वरित तीन फलंदाजांना बाद करत आयर्लंडने झिम्बाब्वेवर ६३ धावांनी मात केली. यासह आयर्लंडने एका कसोटीची मालिका १-० अशी जिंकली. हा विजय आयर्लंडसाठी विशेष ठरला. त्यांनी प्रथमच कसोटीविजयांची हॅटट्रिक यावेळी साजरी केल्याचे पाहायला मिळाले.

दक्षिण आफ्रिकेचा विक्रम मोडीत

आयर्लंडचा कसोटी इतिहास अवघा १० कसोटी सामन्यांचाच! एवढ्या कमी कालावधीतच क्रिकेटच्या या पारंपरिक प्रकारात हॅटट्रिकचा योग आयर्लंडने जुळवून आणला. अशी कामगिरी करत त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा विक्रमही मोडीत काढला. याआधी द. आफ्रिकेने १४ सामन्यांत कसोटीविजयाची हॅटट्रिक नोंदवली होती. आयर्लंडच्या मॅथ्यू हमफ्रेजने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदविताना दुसऱ्या डावात ५७ धावांत ६ फलंदाज टिपले. रविवारी, कसोटीच्या चौथ्या दिवशी ३७ षटकांचा खेळ वाया गेल्यामुळे सोमवारी, पाचव्या दिवशीचा खेळ अर्धातास आधीच सुरू करण्यात आला. अन् आयर्लंडने विजयाची औपचारिकता यावेळी पूर्ण केली. स्कोअरबोर्ड : आयर्लंड २६० (मॅकब्रायन नाबाद ९०, अदेर ७८; मुझराबानी ५८/७, नगारावा ६५/२) आणि २९८ (बलबिरनी ६६, टकर ५८, नगारावा ४/५५) विजयी वि. झिम्बाब्वे २६७ (वेश ९०, मुझाराबानी ४७; मॅककार्थी ७५/४) आणि २२८ (मधेव्हर ८४, बेनेट ४५; हमफ्रेज ६/५७). ११ वर्षांत झिम्बाब्वेला घरच्या मैदानावर कसोटीविजय नोंदविता आलेला नाही... अखेरचा विजय २०१३मध्ये. त्यावेळी पाकिस्तानवर २४ धावांनी मात कसोटीत प्रथम फलंदाजी करत विजयाची नोंद करण्याची आयर्लंडची खेप... पहिल्या डावात त्यांचा निम्मा संघ ३१ धावांत माघारी परतला होता. अशा प्रतिकूल परिस्थितीतून आयर्लंडचे पुनरागमन‘३१ धावांत ५ विकेट... अशा प्रतिकूल परिस्थितीतही आम्ही घाबरलो नाही. नेटाने किल्ला लढवला’, असे सामनावीर ठरलेल्या आयर्लंडच्या अँडी मॅकब्रायनने सांगितले.


from Marathi News: मराठी बातम्या, Delhi Election 2025-26, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/xUw2a3O

No comments:

Post a Comment