अभिजीत दराडे, पुणे : सर्वसाधारणपणे एखादी व्यक्ती गायब झाल्यानंतर 24 तास घरी परत नाही आली तर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात येतो. मात्र, माजी मंत्र्याचा मुलगा गायब होताच अर्ध्या तासातच गुन्हा दाखल करण्यात आला. कंट्रोल रूमला किडनॅप केल्याचा फोन आल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला. कारण गुन्हा दाखल केल्याशिवाय पुढील यंत्रणा फिरत नाही असे स्पष्टीकरण पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिले. तानाजी सावंतांच्या मुलीचे अपहरण झाल्याचे कळताच मोठी खळबळ निर्माण झाली. संध्याकाळी साडेचार वाजता ऋषीराज गायब झाल्याची बातमी त्याच्या ड्रायव्हरने यांचा मोठा मुलगा गिरीराज सावंत याला सांगितली. त्यानंतर गिरीराज सावंत यांनी तानाजी सावंत यांना विचारलं की, पप्पा तुम्हाला सांगून तो एअरपोर्टला गेला आहे का?. त्यानंतर तानाजी सावंत यांनी थेट पुण्यातील पोलीस कमिशनर ऑफिस गाठलं आणि पोलिसांवर कमालीचा दबाव आला. हा दबाव इतका होता की, ऋषीराज आपला मित्रांसोबत एका स्पेशल चार्टर्ड प्लेनमध्ये बँकॉकला जायला निघाला होता. यंत्रणांनी आपल्या सगळ्या बळाचा उपयोग करत विमान मधूनच फिरवलं आणि संध्याकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पुणे विमानतळावर उतरवलं सुद्धा. ऋषीराज हा दहा दिवसांपूर्वीचं दुबईला जाऊन आला होता, त्यामुळे अचानक तो कुठे गेला या चिंतेने तानाजी सावंत ग्रासले होते. अचानक टूर ठरली की, पप्पा रागावतील म्हणून सांगितलं नाही हे मी विचारतो असं उथळ स्पष्टीकरण तानाजी सावंत यांनी दिल. त्यामुळे साधारणपणे पाच तास चाललेल्या या गोंधळात यंत्रणा ही राजकारणाच्या हातातील बाहुली कशी आहे हे संपूर्ण राज्याने पाहिले. तानाजी सावंत यांच्या मुलाच्या होऊ न शकलेल्या बँकॉक ट्रीपमुळे अण्णाभाऊ साठे यांच्या ओळींची आठवण झाल्याशिवाय राहत नाही ही न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झाली,ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली,मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे...!कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली..! -लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
from Marathi News: मराठी बातम्या, Delhi Election 2025-26, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/oYx5Jh8
No comments:
Post a Comment