प्रसाद शिंदे, : अहिल्यानगर बोधेगाव येथील पहिलवान वस्तीवरील पहिलवान बाबा मंदिरातील एका सेवेकऱ्याचा मृतदेह मंदिराजवळील एका विहिरीत आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नामदेव दहातोंडे असं हत्या झालेल्या सेवेकऱ्याचं नाव आहे. नामदेव दहातोंडे हे पहिलवान बाबा मंदिराची गेल्या पंधरा वर्षांपासून साफसफाई करत होते. २६ जानेवारीपासून ते बेपत्ता होते. त्यांच्या बेपत्ता असल्याची तक्रार मंदिराचे पुजारी एकनाथ घोरतळे यांनी पोलीस ठाण्यात दिली होती. दुसरीकडे नामदेव दहातोंडे या सेवेकऱ्याची सर्वत्र शोधाशोध सुरू होती. मात्र मागील आठवडाभरापासून त्यांची कुठेही माहिती मिळत नव्हती.काही दिवसांपासून मंदिर परिसरामध्ये काही तरी मृत जनावर सडल्यासारखी दुर्गंधी पसरली होती. हा वास कुठून येत असावा याचा परिसरात शोध सुरू होता. दुर्गंधी कुठून येते याबाबत तपास घेत असताना मंदिराजवळ असणाऱ्या विहिरीत धड नसलेलं मुंडकं पाण्यात तरंगताना दिसून आलं. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ विहिरीता सापडलेल्या मुंडक्याचं धड शोधण्यास सुरुवात केली. पोलीस प्रशासनाने आसपासच्या परिसरात तपास सुरू केला. या तपासावेळी मंदिराजवळ असलेल्या कोरड्या विहिरीत धड पुरलेल्या अवस्थेत सापडलं. हे अवयव सेवेकरी नामदेव दहातोंडे यांचे होते. मुंडकं पाणी असलेल्या विहिरीत आणि धड कोरड्या विहिरीत सापडलेला मृतदेह सेवेकरी नामदेव दहातोंडे यांचाच असल्याचं उघडकीस आहं. पहिलवान बाबा मंदिरातील सेवेकरी नामदेव दहातोंडे (वय ७०) यांची क्रुरपणे हत्या करण्यात आल्याचं पोलीस तपासात उघड झालं. दहातोंडे यांचं मुंडकं आणि धड वेगवेगळ्या विहिरीत आढळून आलं. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, पोलीस उपअधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी पुढील तपासाचे आदेश दिले आहे. मात्र या क्रूर घटनेने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून ही हत्या नेमकी कशामुळे झाली? आणि कोणी केली? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
from Marathi News: मराठी बातम्या, Delhi Election 2025-26, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/5wZpftW
No comments:
Post a Comment