संतोष शिराळे, सातारा : महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीसुद्धा हुशार आहेत. त्यांना सुद्धा माहिती आहे की आपल्या हिताचे काय आहे. आज शेतकरी, युवक आणि शिक्षकांकडे दुर्लक्ष केले जात आहे. रोज खून, अत्याचार होत आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेची आज वाईट परिस्थिती आहे. सरकार आज धुंदीत आहे, की एवढे मतदान आपल्याला केले आहे. कृपा ईव्हीएम मशीनची! काहीही असले तरी लोकांचा आवाज म्हणून या अधिवेशनामध्ये लढणार आहोत, असं आमदार महायुती सरकारवर टीका करत म्हणाले.जिल्ह्यातील लोणंद येथे शरद कृषी महोत्सव डॉ. नितीन सावंत विचार मंचाच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. या कृषी महोत्सवाला आज आमदार रोहित पवार यांनी हजेरी लावली होती. कृषी प्रदर्शन पाहिल्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
हे सरकार पाच वर्ष राहिल्यास महाराष्ट्राचं भविष्य धोक्यात
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे? असा प्रश्न विचारताच रोहित पवार म्हणाले, ही चर्चाच आहे, म्हणून तर काही होत नाही ना... चर्चेवर आता किती चर्चा करायची? किती वेळ घालवायचा ते सर्वांनी ठरवलं पाहिजे. भविष्यात एकत्र येणार का? यावर ते म्हणाले, भविष्य तर मला काही सांगता येणार नाही. पण आजच तुम्हाला सांगू शकतो हे सरकार असंच पाच वर्षे राहिलं, तर महाराष्ट्राचे भविष्य मात्र धोक्यात आहे.नैतिकता दाखवून कुठेतरी माघार घ्यायला हवी - रोहित पवार
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले, अशी अपेक्षा संपूर्ण महाराष्ट्र व्यक्त करत आहे. भ्रष्टाचार काय केला, कसा केला? त्याचबरोबर देशमुख कुटुंबाबाबतीत जी घटना झाली त्यात नेत्याचा मंत्र्याचा हात होता, नव्हता हा वेगळा विषय आहे. महत्त्वाचं काय आहे की नैतिकता कुठे तरी दाखवण्याची गरज आहे. नैतिकता दाखवून कुठेतरी माघार घ्यायला हवी होती. जो काय न्यायालयाचा निकाल लागेल ते पाहून पुढे निर्णय घ्यायला पाहिजे होता, पण नैतिकता दाखवण्यासाठी धाडस लागतं पण ते आज आजच्या नेत्यांमध्ये नाही, असे म्हणावे लागेल.आधीच्या सरकारने भष्ट्राचार केल्याने राज्य अडचणीत
उद्यापासून राज्यातील कॉन्ट्रॅक्टर कामबंद आंदोलन करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर भूमीवर बोलताना रोहित पवार यांनी हे सरकार कॉन्ट्रॅक्टरांचे ९० हजार कोटी रुपये कसे देणार? असा सवाल उपस्थित केला. एमएसआयडीसी, एमएसआरटीसी, आरोग्य विभागात भ्रष्टाचार करून ते पैसे निवडणुकीसाठी आधीच कॉन्ट्रॅक्टरकडून वसूल केले असल्याचे सांगत राज्य परिवहनच्या दोन हजार कोटींच्या कॉन्ट्रॅक्ट मधून २०० कोटी सत्ताधाऱ्यांनी आधीच काढून घेतले तर एमएसआयडीसीच्या कॉन्ट्रॅक्टमधूनही अशाच प्रकारे १५०० कोटी वसूल करण्यात आले असल्याचा आरोप केला. यावेळेस लाडकी बहिण योजनेतच नाही तर अनेक ठिकाणी सुमारे पन्नास ते साठ हजार कोटींचा मोठा भ्रष्टाचार आधीच्या सरकारकडून झाला असून त्यामुळेच राज्य अडचणीत आले असल्याचे मत व्यक्त केले.from Marathi News: मराठी बातम्या, Delhi Election 2025-26, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/vqZkB3V
No comments:
Post a Comment