मुंबई- असे म्हटले जाते की जर तुम्ही स्टार किड असाल तर बॉलिवूडमध्ये काम मिळवणे आणि नाव कमवणे खूप सोपे आहे, परंतु अभिषेक बच्चनच्या आयुष्याकडे आणि कारकिर्दीकडे पाहिले तर तुमच्या शंकेचे नक्कीच निरसरण होईल. स्टार किड असणे ही त्याच्यासाठी सर्वात मोठी समस्या बनली. अमिताभ बच्चन यांचा मुलगा असल्याने त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या. जर अपेक्षेचा असा दबाव नसता तर तो कदाचित त्याच्या वडिलांप्रमाणे किंवा शाहरुख खानप्रमाणे बॉलिवूडवर राज्य करू शकला असता. आज ५ फेब्रुवारी रोजी त्याचा ४९ वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला त्याच्या आयुष्याशी संबंधित काही मनोरंजक गोष्टी सांगणार आहोत, बॉलिवूड स्टार अभिषेक बच्चन हा एक असा अभिनेता आहे ज्याने इंडस्ट्रीत निश्चितच स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण त्याला त्याच्या वडील किंवा बायकोप्रमाणे यश मिळवता आले नाही. अभिषेक बच्चनचे खरे नाव मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा मुलगा असल्याने, त्याच्या खांद्यावर अपेक्षेचा खूप दबाव होता, परंतु सर्व दबावांना तोंड देऊनही, त्याने चित्रपट आणि अभिनयाद्वारे विरोधकांची तोंडे बंद केली. 'ज्युनियर बच्चन' या नावाने अभिषेक बच्चनला ओळखले जाते, पण त्याचे खरे नाव अभिषेक श्रीवास्तव आहे. हरिवंश राय बच्चन यांनी लिहायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या कुटुंबाला 'बच्चन' हे नाव देण्यात आले. त्यांचा मुलगा अमिताभ यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश करून हेच नाव पुढे नेले, आता अभिषेकने ही परंपरा पुढे चालू ठेवली आहे. अभिषेकची ज्युनियर बच्चन, एबी अशी अनेक टोपण नावे आहेत. इंडस्ट्रीतील लोक त्याला बरेचदचा याच नावाने हाक मारतात. शिक्षण अर्ध्यावरच सोडले आणि अभिनेता बनण्याचा निर्णय घेतला. इंडस्ट्रीतील इतर अनेक कलाकारांप्रमाणे अभिषेकनेही बॉम्बे स्कॉटिश हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. योगायोगाने, 'धूम' सीरिजमधील त्याचे सहकलाकार ऋतिक रोशन आणि जॉन अब्राहम यांनीही त्याच शाळेत शिक्षण घेतले. शालेय शिक्षणानंतर, अभिषेक बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदवी मिळविण्यासाठी अमेरिकेला गेला परंतु अखेर त्याने शिक्षण सोडले. त्याऐवजी, तो बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी भारतात परतला, त्याच्या वडिलांनी या निर्णयाला पूर्ण पाठिंबा दिला. अभिषेकने २००० मध्ये जे.पी. दत्ता यांच्या 'रिफ्यूजी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, या सिनेमात त्याच्यासोबत करीना कपूर दिसली होती. अभिषेक बच्चनने १७ फ्लॉप चित्रपट दिले 'रिफ्यूजी' हा अभिषेकच्या फ्लॉप चित्रपटांमध्ये गणला जातो, परंतु प्रत्यक्षात तो २००० मधील पाचवा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. त्यानंतर चार वर्षांनी, २००४ मध्ये, तो 'धूम' चित्रपटाद्वारे पहिला हिट चित्रपट देण्यात यशस्वी झाला. या काळात त्याने १७ चित्रपटांमध्ये काम केले, जे सर्व बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले. अभिषेकचा आवाजही त्याच्या वडिलांसारखाच आहे आणि म्हणूनच त्याने त्याचा चांगला वापर करण्याचा निर्णय घेतला. त्याने एका गाण्यासाठी रॅप केले ज्यामध्ये कॅनेडियन गायक राघव आणि अमेरिकन रॅपर नेली देखील होते. अभिषेक बच्चन सध्या फारशा सिनेमात दिसत नसला तरी त्याच्या मालकीची कबड्डी टीम आहे. तो जयपूर पिंक पॅँथर टीमचा मालक आहे. या टीमच्या सर्व मॅचला अभिषेक उपस्थित असतो. २०१४ मध्ये त्याने या टीममध्ये पैसे इनव्हेस्ट केले होते. आता त्याची किंमत जवळपास १०० कोटींच्या घरात पोहचली आहे. फुट बॉल टीम अभिषेक बच्चन हा चेन्नई एफसी फुटबॉल संघाचा सह-मालक देखील आहे. त्याने विटा दानी आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यासोबत या संघात गुंतवणूक केली होती. अभिषेकला खेळांमध्येही खूप रस आहे. म्हणूनच जेव्हा घूमर हा चित्रपट त्याच्याकडे आला तेव्हा तो तो नाकारू शकला नाही. याशिवाय अभिषेक बच्चन वेगवेगळ्या ठिकाणी प्रॉपर्टीमध्येसुद्धा बरेच इन्व्हेस्ट करतो.
from Marathi News: मराठी बातम्या, Delhi Election 2025-26, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/lPSIcKN
No comments:
Post a Comment