
हिंगोली : यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री यांचा सत्कार करण्यात आल्याने मोठा गदारोळ निर्माण झालाय. संजय राऊत यांनी यावर भाष्य करत नाराजी जाहीर केली. संजय राऊत थेट म्हणाले की, गद्दारी करणाऱ्या एकनाथ शिंदेचा सत्कार शरद पवारांनी करायला नको होता आणि कार्यक्रमात शिंदे असताना शरद पवार यांनी तिथे जायला नको हवे होते. एकनाथ शिंदे यांचा सत्कार शरद पवार यांनी केल्याने विविध चर्चांना उधाण आल्याचे बघायला मिळतंय. मुळात म्हणजे मागील काही दिवसांपासून एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामध्ये आता शरद पवार आणि एकनाथ शिंदे हे एकत्र आले. आता शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीबद्दल बोलताना शिवसेनेचे आमदार हे दिसले आहेत. संतोष बांगर म्हणाले की, मला वाटते की, जो काम करत असतो, त्याचे काैतुक होत असते. उपमुख्यमंत्री ज्यावेळी मुख्यमंत्री होते, त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्राने आणि भारत देशाने त्यांचे काम बघितले आणि त्यांचे जर काैतुक शरद पवार साहेब करत असतील तर मला वाटते की, शरद पवारांनी चांगल्या कामाची थाप शिंदे साहेबांना दिलीये.संजय राऊतांबद्दल बोलताना संतोष बांगर हे म्हणाले की, गद्दारी गद्दारी अरे लोकांनी तुम्हाला दाखवले ना. कोण गद्दार आहे आणि कोण नाही. गद्दार जर असते तर 60 आमदार निवडून आले असते का? खरी गद्दारी तुम्ही केली आणि शरद पवार साहेबांना हे उशीरा समजले. शरद पवार साहेबांनी चांगल्या मानसाच्या पाठीवर थाप दिली. तुमच्या तर थोबाडीत मारायला पाहिजे. संयमी राजकारणी म्हणून शरद पवारांचा चेहरा राज्यात पुढे येतो. बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच शरद पवारांचे काम असल्याचेही बांगर यांनी म्हटले. एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची वाढलेली जवळीक्ता उद्धव ठाकरे यांना देखील पटलेली नाहीये. त्यांनी देखील यावर भाष्य केले. एकनाथ शिंदे आणि शरद पवारांच्या वाढलेल्या जवळीक्तेबद्दल बोलताना संतोष बांगर म्हणाले की, मी लहान कार्यकर्ता आहे आणि जो काही निर्णय घ्यायचा ते एकनाथ शिंदे घेतील. शरद पवार गटासोबत एकनाथ शिंदे जाणार का? अशी जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Delhi Election 2025-26, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/C5nHzuj
No comments:
Post a Comment