मुंबई- बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट देणारे यांचा आज वाढदिवस आहे. या दिग्दर्शकाने अनेक स्टार्सचे आयुष्य घडवले आहे, पण त्यांचे स्वतःचे खरे आयुष्य संघर्षांनी भरलेले होते. रोमँटिक चित्रपट देणाऱ्या साजिदच्या आयुष्यातून प्रेम निघून गेले होते. साजिद जितका त्याच्या चित्रपटांसाठी ओळखला जातो तितकाच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिला आहे. दिव्या भारतीचे नाव येताच साजिद नाडियाडवालाचेही नाव सहाजिकच समोर येते. त्यांच्या अफेअरची बातमी त्याकाळी सर्वत्र पसरली होती. मात्र त्यांच्या प्रेमावर काळानेच घाला घातला आणि अभिनेत्रीचे लहान वयातच निधन झाले त्यामुळे साजिद पुर्णपणे एकटे पडले होते. आज, साजिद नाडियाडवालाच्या वाढदिवसानिमित्त, आपण त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेत आहोत.अशा प्रकारे त्याच्या कारकिर्दीची सुरुवात झाली साजिद नाडियाडवालाने आयुष्यात खूप संघर्ष केला. या प्रसिद्ध दिग्दर्शकाने आपल्या कारकिर्दीची सुरुवात एसी टेक्निशियन म्हणून केली. यानंतर त्याने चित्रपटसृष्टीत स्पॉट बॉय बनून पैसे कमवले. पुढे त्याने चित्रपटसृष्टीतील एका प्रॉडक्शन हाऊसमध्ये सहाय्यक निर्माता म्हणून काम केले.त्यानंतर २०१४ मध्ये साजिदने 'किक' चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. या चित्रपटात अभिनेता मुख्य भूमिकेत होता. पहिला चित्रपटच हिट झाला. त्या सिनेमाने १०० कोटींहून अधिकला गल्ला जमावला होता. अनेक स्टार किड्सचे नशीब उजळलेसाजिदने इंडस्ट्रीला अनेक हिट चित्रपट दिले आहेत, म्हणूनच त्याला हिट फिल्म मशीन असेही म्हटले जाते. दिग्दर्शक म्हणून त्याने त्याच्या चित्रपटांमध्ये अनेक स्टार किड्सना काम दिले आणि त्यांना यशाची शिडी चढण्यास मदत केली. या यादीत सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी, जॅकी श्रॉफचा मुलगा टायगर श्रॉफसह अनेक नावे आहेत.साजिद दिव्याच्या प्रेमात पडला रिपोर्ट्सनुसार, साजिद नाडियाडवाला पहिल्याच नजरेत दिव्या भारतीच्या प्रेमात पडला. त्यांचे प्रेम फुलत गेले आणि हळूहळू बॉलिवूडमध्ये सर्वांनाच या गोष्टीची खबर लागली. साजिदने दिव्याशी लग्न केले जेव्हा ती १९ वर्षांची होती. दोघांनी त्यांचे लग्न गुप्त ठेवले होते पण दिव्याचा गूढ मृत्यू झाल्यानंतर ते प्रसिद्धीच्या झोतात आले. अभिनेत्रीचा तिच्याच अपार्टमेंटवरून पडून मृत्यू झाला. दिव्याचा मृत्यू कसा झाला हे आजपर्यंत कोणालाही माहिती नाही.सलमान खानमुळे दुसरे लग्न एकदा द कपिल शर्मा शोमध्ये, साजिद खानने स्वतः कबूल केले की त्याचे दुसरे लग्न सलमान खानमुळे झाले. तो म्हणाला की सलमान खान त्याला म्हणाला होता की लग्न करावंसं वाटतंय, पण जर का तू केलंस तरच मीही करेन. त्यामुळे मी वर्धा खानशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या दिवशी सलमान आला आणि माझ्या कानात कुजबुजला, "मी माझा विचार बदलला आहे. जर तुला लग्न टाळायचे असेल तर माझी गाडी तुझ्या मागे उभी आहे.....पळून जा."
from Marathi News: मराठी बातम्या, Delhi Election 2025-26, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/tq6am4l
No comments:
Post a Comment