Breaking

Tuesday, February 11, 2025

...तरीही मला भारतीय संघाबाहेर जावं लागलं, अजिंक्य रहाणेने अखेर 'ती' खरी गोष्ट सांगितली... https://ift.tt/JBAochS

विनायक राणे : अजिंक्या रहाणे हा एक लढवय्या खेळाडू आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. रणजी सामन्यात अजिंक्य रहाणेने शतक झळकावले आणि मुंबईला सेमी फायनलमध्ये पोहोचवण्यात त्याने सिंहाचा वाटा उचलला. पण या विजयानंतर आता अजिंक्य रहाणेने भारतीय संघाबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे. मला भारतीय संघाबाहेर का जावं लागलं, याबाबत आता अजिंक्य रहाणेने सर्वांसमोर खरी गोष्ट सर्वांना सांगितली आहे.'मला अजूनही कसोटी खेळायचे आहे. कोण जाणे, कधी, काय होईल? माझे अजून बरेच क्रिकेट शिल्लक आहे; म्हणूनच वर्तमानात समृद्ध करत भविष्याकडे कूच करतो आहे', असे आश्वासक उद्गार काढले ते भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणेने. मंगळवारी रणजी उपांत्यपूर्व सामन्यात मुंबईने हरियाणावर मात केल्यानंतर त्याने पत्रकारांशी हा संवाद साधला.'जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या गेल्या लढतीत मी छानच खेळलो होतो. तरीही मला संघाबाहेर जावे लागले! असो... तो झाला भूतकाळ. मला वर्तमानावर लक्ष्य केंद्रित करत खेळ उंचावत कूच करत रहायचे आहे. धावाचा रतिब सुरू असून मुश्ताक अली टी-२० स्पर्धेतही प्रभावी ठरलो. आपल्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांनी कायम भरभरून दिले आहे. कामगिरीची भूक कायम असून सर्वोच्च कसोटी क्रिकेटचा मी आदर करतो. बघू भविष्यात काय होते...', असे हा अभ्यासू फलंदाज म्हणाला.'भारताने गेल्या काही महिन्यांत न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका गमावल्या. त्यावेळी संघात असतो तर मी काय केले असते, असे विचार मी करत नाही. आता मुंबईचे प्रतिनिधित्व करत असल्याने संपूर्ण लक्ष मुंबईवरच आहे...', असेही अजिंक्यने सांगितले. 'ईडन गार्डन्सवर चौथ्या डावात तिनशेपेक्षा जास्त धावांचा पाठलाग करणे कठीण जाते हे ठाऊक होते. मात्र आम्ही विजय गृहित धरला नाही...', असा अजिंक्यचा दृष्टिकोन आहे.अजिंक्य रहाणे हा सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्मात आहे. पण या दमदार कामगिरीच्या जोरावर त्याच्यासाठी भारतीय संघाचे दार उघडणार का, याची उत्सुकता आता सर्वांनाच लागलेली असेल.


from Marathi News: मराठी बातम्या, Delhi Election 2025-26, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/cAVFY30

No comments:

Post a Comment