Breaking

Monday, February 10, 2025

१३ वर्षांतच संपलं करिअर, अब्जाधीशाच्या प्रेमात पडल्या टीना मुनीम, नीता अंबानींच्या जाऊबाईंची संपत्ती केवढी माहितीये? https://ift.tt/VKsEPvG

मुंबई- १९७८ मध्ये 'देस परदेस' या चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या आज एका अब्जाधीश कुटुंबाची सून आहे. त्यांनी चित्रपटसृष्टीत १३ वर्षे काम केले. त्यामध्ये सुमारे ३५ चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला. कधी गौरी, कधी टीना आणि नॅन्सी अशा नावांनी त्या पडद्यावर झळकल्या. लोकांच्या मनावर राज्य करत असतानाच अचानक त्यांनी इंडस्ट्रीला निरोप दिला आणि त्या वैयक्तिक आयुष्यात मग्न झाल्या. आम्ही तुम्हाला अभिनय सोडण्यामागील कारणापासून ते त्याच्या एकूण संपत्तीपर्यंत सर्व काही सांगणार आहोत. टीना मुनीम यांचा जन्म ११ फेब्रुवारी १९५७ रोजी झाला. त्यांनी १९७५ मध्ये पदवी पूर्ण केली. त्याच वर्षी त्यांना फेमिना टीन प्रिन्सेस इंडिया १९७५ ही पदवी मिळाली. यानंतर, त्यांनी आणखी काही सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि त्यामध्येही त्या दुसऱ्या उपविजेत्या ठरल्या. टीना या गुजराती जैन कुटुंबात लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांचे खरे नाव निवृत्ती मुनीम आहे. आज त्या त्यांचा ६८ वा वाढदिवस साजरा करत आहेत. टीना मुनीम यांनी 'कर्ज', 'रॉकी', 'ये वादा रहा', 'अधिकार', 'आखिर क्यों?' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. १९९१ पर्यंत त्यांनी अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले. पण त्यानंतर त्यांनी इंडस्ट्री सोडली. टीना मुनीमने अभिनय का सोडला? सिमी ग्रेवालच्या चॅट शोमध्ये टीना मुनीम यांनी इंडस्ट्री सोडण्याचे कारण सांगितले. त्या म्हणल्या की, 'कधीकधी मला असेही वाटते की मी चित्रपट खूप लवकर सोडले, पण नंतर मला असे वाटले की जगात असे बरेच काही आहे जे मला फक्त चित्रपटांपुरते मर्यादित न राहता एक्सप्लोर करायला आणि अनुभवायचे मिळते. मी अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला. मला कधीही पश्चात्ताप झाला नाही. मला कधीच परत जायचे नव्हते, कधीच नाही. २ फेब्रुवारी १९९१ रोजी टीना मुनीम यांनी अनिल अंबानींशी लग्न केले. ते एकेकाळी जगातील सहावे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. २०२० मध्ये त्यांना दिवाळखोर घोषित करण्यात आली.. लग्नानंतर टीना मुनीम टीना अंबानी झालियी. त्यांना दोन मुले होती. जय अनमोल अंबानी आणि जय अंशुल अंबानी. अनिल अंबानी हे मुकेश अंबानी यांचे धाकटे भाऊ असल्याने, टीना अंबानी या नीता अंबानींच्या जाऊबाई आहे. टीना अंबानी मुंबईत 'अ‍ॅबोड' नावाच्या १७ मज्यावरील घरात राहतात. मुंबईतील वांद्रे येथे असलेली, १६,००० चौरस फूट क्षेत्रात पसरलेली ही मालमत्ता २००० च्या दशकाच्या सुरुवातीला अनिल अंबानी यांनी खरेदी केली होती. डीएनए आणि इतर माध्यमांच्या वृत्तानुसार, सुमारे ५,००० कोटी रुपये किमतीचा हा ७० मीटर उंच टॉवर देशातील सर्वात महागड्या घरांपैकी एक आहे. टीना अंबानीच्या घरात काय आहे? अनिल अंबानींच्या घरात टेरेसवर बाग, बाहेर स्विमिंग पूल, एक उत्तम जिम, मल्टी-कार पार्क गॅरेज आणि हेलिकॉप्टर पार्क करू शकणारे हेलिपॅड आहे. टीना अंबानीकडे किती गाड्या आहेत? वृत्तानुसार, टीना अंबानीकडे एक खाजगी जेट आहे. त्याची किंमत ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते. याशिवाय त्यांच्याकडे अनेक आलिशान गाड्या आहेत. एक रोल्स रॉयस फॅंटम (किंमत ३.५ कोटी रुपये), दुसरी ऑडी क्यू७ (किंमत सुमारे ८८ लाख रुपये), तिसरी मर्सिडीज जीएलके ३५० (किंमत सुमारे ७७ लाख रुपये) आहे. टीना अंबानी सामाजिक कार्य टीना अंबानी अनेक सामाजिक कार्यात सहभागी आहेत. २००४ मध्ये त्यांनी वृद्धांच्या कल्याणासाठी एक संस्था सुरू केली. याशिवाय त्या आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय कला प्रमोट करण्याचे काम देखील करते. एवढेच नाही तर ती मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयाची त्या अध्यक्षा आहे. त्यांच्या देखरेखीखाली कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट सुरू करण्यात आले. याशिवाय, माजी अभिनेत्री हार्मनी आर्ट फाउंडेशनची अध्यक्षा आहे. टीना अंबानीची एकूण संपत्ती किती आहे? सोशल मीडियावर उपल्ब्ध माहितनुसार टीना अंबनांनकडे यांची एकूण संपत्ती २,३३१ कोटी रुपये आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Delhi Election 2025-26, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/QKp2Aqn

No comments:

Post a Comment