Breaking

Saturday, February 22, 2025

ती निर्णायक रात्र, तुला मी तुझ्या आयुष्यात हवी असेन तर.... राजघराण्यातल्या भाग्यश्रीने प्रेमासाठी उचलेलं मोठं पाऊल https://ift.tt/KAXRF82

मुंबई- मैंने प्यार किया मधील अभिनेत्री भाग्यश्री आज २३ फेब्रुवारी तिचा वाढदिवस साजरा करत आहे. भाग्यश्रीचा जन्म २३ फेब्रुवारी १९६९ रोजी महाराष्ट्रातील सांगली येथील राजघराण्यात झाला. तिचे वडील विजय सिंहराव माधवराव पटवर्धन हे सांगलीचे महाराज होते.भाग्यश्रीचे लग्न हिमालय दासानीशी झाले आहे. दोघांनीही प्रेमविवाह केला होता. २०१७ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या प्रेम जीवनाशी संबंधित अनेक गुपिते उघड केली होती. भाग्यश्रीच्या म्हणण्यानुसार, ती आणि तिचा नवरा दोघेही शाळेत एकत्र शिकले होते. भाग्यश्रीने सांगितले की, काही काळानंतर हिमालय अमेरिकेला गेले होते. त्यादरम्यान भाग्यश्रीला 'मैंने प्यार किया' या चित्रपटाची ऑफर मिळाली. सुरुवातीला हिमालयशी लग्न लावून देण्याबाबत भाग्यश्रीचे कुटुंब तिच्या विरोधात होते. पण नंतर तिने त्यांना मनवले.ते दीड वर्ष वेगळे होतेभाग्यश्री म्हणाली, 'हिमालयजी माझे पहिले प्रेम होते आणि मी त्यांच्याशीच लग्न केले. पण आम्हा दोघांमध्ये वेगळे राहण्याचा काही काळ होता. त्यावेळी मला अशी भावना होती की जर तो माझ्या आयुष्यात आला नसता तर काय झाले असते... भाग्यश्रीने पुढे सांगितले की, 'यानंतर, आम्ही दोघेही सुमारे दीड वर्षे एकत्र नव्हतो. आजही तो काळ मला आठवला तर मला भीती वाटते.' आमचे पालक आम्हाला भेटू देत नव्हते किंवा फोनवरही बोलू देत नव्हते.मंदिरात लग्न केले.मी हिमालयला फोन केला आणि विचारले, 'तुला आपल्या दोघांबद्दल पूर्ण खात्री आहे का?' भाग्यश्री म्हणाली की तो निर्णयाचा दिवस होता की एकतर मी त्याच्या आयुष्यात कायमची राहीन किंवा मी कधीही राहणार नाही. मी हिमालयाला सांगितले, 'मी माझे घर सोडत आहे. जर तुझे माझ्यावर प्रेम असेल तर ये आणि मला घेऊन जा. पुढे १५ मिनिटांनी तो माझ्या घराखाली होता. आमचे लग्न एका मंदिरात झाले जिथे त्यांचे आईवडील, सलमान खान, सूरज जी आणि काही मित्र उपस्थित होते.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/b0KCYk9

No comments:

Post a Comment