
मुंबई: '' (Ind Vs Pak) यांच्यातील 'चॅम्पियन्स ट्रॉफी'मधील सामना दोन्ही देशांसाठी एक महत्त्वाचा सामना आहे. हा खेळ पाहण्यासाठी अनेक सेलिब्रिटी दुबईत पोहोचले होते, यावेळी एका सेलिब्रिटीने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. या हाय व्होल्टेज सामन्यात ब्रिटिश गायिका आणि टीव्ही सेलिब्रिटी जास्मिन वालियाही (Jasmin Walia) स्पॉट झाली. जास्मिनने लक्ष वेधून घेण्यामागचे कारण म्हणजे, गेल्या काही महिन्यांपासून अशी चर्चा आहे ती भारताचा स्टार क्रिकेटपटू हार्दिक पंड्याला डेट (Hardik Pandya Dating) करते आहे. २३ फेब्रुवारी रोजी दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये होत असलेला भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना जास्मिन एन्जॉय करताना दिसली. ब्रिटिश गायिकेचा या सामान्यादरम्यानचा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून, यानंतर तिच्या आणि हार्दिककच्या नात्याविषयी अधिक बोलले जाते आहे. तिला याठिकाणी पाहून तिच्या आणि हार्दिकच्या अफेअरच्या चर्चांना आणखी हवा (Who is Jasmin Walia Hardik Pandya Rumoured Girlfriend) मिळाली आहे. जास्मिन अक्षर पटेलच्या पत्नीच्या शेजारी बसल्याचेही अनेक नेटकऱ्यांच्या निदर्शनास आले. याशिवाय जास्मिन खेळाडूंना चिअर करतानाही स्पॉट झाली. दरम्यान नताशा स्टॅनकोव्हिकसोबतच्या घटस्फोटानंतर लगेचच हार्दिक आणि जास्मिन यांचे नाव जोडले गेले होते, मात्र अद्याप दोघांनीही त्यांच्या रिलेशनशिपविषयी कोणतीही घोषणा केलेली नाही. काही महिन्यांपूर्वी या दोघांचे ग्रीसमधील फोटो समोर आलेले. त्यांनी एकत्र फोटो पोस्ट केले नव्हते, पण जास्मिन आणि हार्दिक यांनी पोस्ट केलेल्या वेगवेगळ्या फोटोंमधूनही अनेकांनी अंदाज बांधलेला की ते एकत्र सुट्टी एन्जॉय करत आहेत. हार्दिक आणि जास्मिन यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये साम्य दिसून आल्यानंतर त्यांच्या अफेअरच्या अफवा पसरल्या होत्या. तसेच जास्मिन हार्दिकला इन्स्टाग्रामवर फॉलो करत असून, क्रिकेटपटूहू तिच्या अनेक पोस्ट लाइक करतो. ही बाब नेटकऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर या चर्चांना आणखी हवा मिळाली. दरम्यान हार्दिकचे वैयक्तिक आयुष्य चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नव्हे. त्याने २०२० मध्ये अभिनेत्री-मॉडेल नताशा स्टॅन्कोविकशी लग्न केले होते आणि त्यांनतर या दोघांनी २०२३ मध्ये पुन्हा एकदा थाटामाटात लग्न केले. जुलै २०२४ मध्ये मात्र त्यांनी घटस्फोट घेतला आणि सध्या ते त्यांचा मुलगा अगस्त्यचे एकत्र पालकत्व निभावत आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/bvBGSne
No comments:
Post a Comment