Breaking

Saturday, February 22, 2025

महाकुंभ मेळा उद्घाटन समारंभात २ मिनिटांचा शंखनाद केला? व्हायरल Video चं सत्य काय? https://ift.tt/RgDjmE1

नवी दिल्ली : प्रयागराज इथे महाकुंभमेळा सुरू आहे. महाकुंभमधील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच एक शंखनादाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. महाकुंभमेळा महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात गंगा घाटावर भव्य आरतीसह २ मिनिटं ४९ सेकंद अखंड शंखनाद सुरू असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शंखनादाचा विश्वविक्रम झाल्याचा दावा केला जात आहे. मात्र सोशल मीडियावर हा शंखानादाचा व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह शेअर केला जात आहे. बूमने या व्हायरल व्हिडिओबाबत केलेल्या तपासात असं आढळलं, की २ मिनिटं ४९ सेकंदाचा अखंड शंखनादचा व्हिडिओ वाराणसीचा आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काशीतील दशाश्वमेध घाटावर गंगा आरतीमध्ये सहभागी झाल्या होत्या. यावेळी वाराणसीच्या रामजनम योगींनी हा शंख फुंकून शंखनाद केला होता.फेसबुकवर एका ने हा व्हिडिओ शेअर करत लिहिलंय, की 'महाकुंभ महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात २ मिनिटे ४९ सेकंदांचा सतत शंख फुंकण्याचा विश्वविक्रम केला आहे. जय महादेव.'.

पडताळणीत काय समोर?

व्हिडिओचा तपास करताना व्हायरल व्हिडिओमध्ये नावाचा लोगो असल्याचं दिसतं आहे. यावरूनच व्हायरल दाव्याशी संबंधित कीवर्ड सर्च केले. त्यावेळी बूमला तपासात व्हायरल होणारा व्हिडिओ १३ फेब्रुवारी २०२३ रोजी व्हीके न्यूजच्या यूट्यूब चॅनेलवर शेअर केलेला आढळला. या व्हिडिओचं टायटल आहे - 'गंगा घाटावर भक्ताने असा शंख फुंकला, की राष्ट्रपती मुर्मूही बघतच राहिल्या.'बूमने व्हायरल शंखानादाच्या व्हिडिओ संबंधित इतर मीडिया रिपोर्ट्स सर्च केले, त्यावेळी असं आढळलं, की १३ फेब्रुवारी २०२३ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू एक दिवसीय दौऱ्यासाठी वाराणसीला पोहोचल्या होत्या. आणि च्या रिपोर्टनुसार, 'राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू काशीच्या जगप्रसिद्ध दशाश्वमेध घाटावर गंगा आरतीमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही होते.'राष्ट्रपतींच्या अधिकृत वरही या कार्यक्रमाबाबत व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. या गंगा आरतीवेळी वाराणसीतील रामजनमने हा शंख फुंकला होता. ज्याने शंख फुंकला, त्या रामजनमबद्दल आणखी काही मीडिया रिपोर्ट्स आढळले. च्या १९ जून २०२४ च्या वृत्तानुसार, रामजनम हा वाराणसीच्या चौबेपूरचा रहिवासी आहे. तसंच तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदाच आपला संसदीय मतदारसंघ वाराणसीमध्ये आले होते, तेव्हा देखील रामजनम यांनी २ मिनिटं ४० सेकंद सतत शंख फुंकत शंखनाद केला होता.एनडीटीव्ही इंडियाच्या नुसार, रामजनम यांनी राष्ट्रपती मुर्मू, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ आणि अमित शहा यांच्याशिवाय, त्यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि जपानचे माजी पंतप्रधान आणि दिवंगत नेते शिंजो आबे यांसारख्या परदेशी नेत्यांनाही आपल्या शंखनादाने आश्चर्यचकित केलं होतं.(This story was originally published by , and republished by MT as part of the Shakti Collective.)


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Xnw2pjo

No comments:

Post a Comment