नवी दिल्ली : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच्या संघात आता छावा सिनेमाचा जलवा पाहायला मिळाला तर आश्चर्य वाटून घेऊ नका, कारण भारताचे मुख्य प्रशिक्षक यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत एक पोस्ट केली आहे. या एका पोस्टमध्ये गंभीर यांनी सर्वांची मनं जिंकली आहेत आणि ही पोस्ट आता जगभरात चांगलीच व्हायरल झाली आहे.चॅम्पियन्स ट्रॉफी आता काही तासांवर येऊ ठेपली आहे. पण त्यापूर्वीच गौतम गंभीर यांची एकच पोस्ट आता सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. कारण या पोस्टमध्ये गौतम गंभीरने आता छत्रपती संभाजी महाराजांबद्दल फक्त दोन शब्द लिहिले आहेत. पण या फक्त दोन शब्दांत गौतम गंभीर यांनी सर्वांची मनं जिंकल्याचे पाहायला मिळत आहे.विकी कौशलचा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत छावा सिनेमा प्रदर्शित झाल्यावर सर्वच मोहित झाले आहेत. चाहत्यांनी या सिनेमाला डोक्यावर घेतलं आहे. या सिनेमाची जादू फक्त सामान्य माणसांवरच चाललेली नाही, तर गौतम गंभीरसारख्या भारतीय संघाचे सर्वात मोठे पद स्विकारणाऱ्या व्यक्तीवरही झाली आहे. गौतम गंभीर यांचे देशप्रेम सर्वांनाच माहिती आहे. आता छावा सिनेमा प्रदर्शित झाल्यावर गौतम गंभीर यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत फक्त दोन शब्दांत जे कौतुक केले आहे, ते सर्वांनाच आवडले आहे. गौतम गंभीर यांनी यावेळी म्हटले आहे की, छत्रपती संभाजी महाराज... मातृभूमीसाठी समर्पण... गंभीरने यावेळी फक्त दोन शब्दांत छत्रपती संभाजी राजे यांना मानाचा मुजरा केला आहे. त्यामुळे गौतम गंभीर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पण गौतम गंभीर यांनी हा सिनेमा पाहिला की नाही, हे त्यांनी सांगितलेले नाही. पण त्यांच्या या पोस्टवरून त्यांनी सिनेमा पाहिला असावा, असे समजले जात आहे. भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आता २० फेब्रुवारीला बांगलादेशबरोबर दोन हात करणार आहे, त्यानंतर भारताचा सर्वात महत्वाचा सामना होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हा रविवारी २३ फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना २ मार्चला खेळवण्यात येणार आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Delhi Election 2025-26, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/teCqBwM
No comments:
Post a Comment